शिर्डी येथे राष्ट्रीय आयुष ग्लोबल अवॉर्ड पुरस्कार 2023 ने डॉ. कुलभूषण मोरे सन्मानित

69

🔹आरोग्य सेवेतील कार्याचा गौरव

✒️सय्यद शब्बीर जागीरदार₹जिवती तालुका प्रतिनिधी)

जिवती(दि.31ऑक्टोबर):-यावर्षीचा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व केंद्रीय मंत्रालय एम एस बी टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आयुष इंटरनॅशनल ग्लोबल अवार्ड 2023 राष्ट्रीय पुरस्कार हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांना प्रदान करण्यात आलाआहे. 29आक्टोबर 2023 ला रविवारी शिर्डी येथे राष्ट्रीय सत्कार समारंभ आयोजित केला होता .

याप्रसंगी एम एस बी टी इ केंद्रीय मंत्रालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोशी सर मोरया सर सिने अभिनेते संजय गोरे , डॉक्टर नितीन राजे पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते डॉ मोरे याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला….दरवर्षी देशातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन तथा MSBTE केंद्रीय मंत्रालय यांच्या संयुक्त द्वारा या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते डॉक्टर कुलभूषण हरिभाऊ मोरे यांनी अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जिवती व कोरपणा या तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ आरोग्य सेवेमध्ये महिलांच्या मासिक पाळी मध्ये जनजागृती कार्यक्रम राबविला आहे कापडी सॅनिटरी नॅपकिन प्रोजेक्ट द्वारा सॅनिटरी नॅपकिन वितरण व महिलांच्या आरोग्याबद्दल महिलांना जनजागृति करण्यात येते तसेच विविध आरोग्य शिबिर द्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत.

यामध्ये मोफत मोतीबिंदू शिबिर मोफत बालरोग शिबिर मोफत स्त्रीरोग शिबिर मोफत जनरल तपासणी शिबिर आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील कुपोषित बालकांना मोफत आरोग्य तपासणी करून आहार पोषण वाटप केलेले आहेत….. कोरोना काळात डॉ कुलभूषण मोरे यांनी अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्याकरिता हजारो कापडी मास्क मोफत वाटप केले होते तसेच कोरोना बद्दल जनजागृती कार्यक्रम ही राबविला आहे.