सकल मराठा समाजाच्या उपोषणास, वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पुसद तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा

76

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.31ऑक्टोबर):-मा. श्री जरांगे पाटील यांच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीरामपूर पुसद येथे साखळी उपोषणास आज पासून सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशाने श्रीरामपूर मध्ये जे उपोषण सुरू झाले आहे त्यास वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी तसेच शहर कार्यकरणी च्या वतीने आज पक्षाच्या लेटर पॅडवर जाहीर पाठिंबा दर्शविला आहे।

याप्रसंगी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके, शहर संघटक मधुकर सोनवणे, शहर महासचिव डॉक्टर अरुण राऊत, शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, जिल्हा परिषद सर्कल निरीक्षक मिलिंद पठाडे, निकेश कांबळे, शुभम खंदारे, राहुल धुळे सिद्धार्थ बर्डे, वैभव सूर्यवंशी असे अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.