अमरदीप लोखंडे यांचा “महात्मा ज्योतिबा फुले” समाजरत्न पुरस्काराने सन्मान

139

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6नोव्हेंबर):- ब्रम्हपूरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील रहिवासी श्री अमरदीप लोखंडे कवी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक ,पर्यावरण पुरक मोकळ्या जागेत झाडे लाऊन त्यांची जोपासना करुन मोठे करण्यासाठी मेहनत घेणारे , गोरगरीब गरजूंच्या मदतीला धावून जाणारे ,शिक्षणासाठी गरजूंना आर्थिक, शारीरिक मदत करणारे पत्रकार अशी ओळख असणारे श्री अमरदीप लोखंडे यांनी केलेल्या वरील कार्याची दखल नागपुर येथील “मदत” या सामाजिक संस्थेने घेतली आणि त्यांना “महात्मा ज्योतिबा फुले” समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले.

सदर पुरस्कार २१व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात श्री गुरुदेव सेवाश्रम सभागृह,नागपुर येथे नानाभाऊ पटोले आमदार यांच्या अध्यक्षतेखाली माननीय गिरीश भाऊ पांडव आमदार यांचे हस्ते देण्यात आला.मागील वर्षी त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार मिळाला होता.

व्यासपीठावर मदत सामाजिक संस्थेचे सचिव तथा आयोजक श्री दिनेशबाबु वाघमारे, अनिल नगराळे सरचिटणीस ,ईश्वर मेश्राम, एडवोकेट अशोक यावले ,संजय कडोळे ,युवराज चौधरी ,परमानंद सरदार, अशोक गवळी, रेखाताई थुलकर, सुरेखा दिनेश वाघमारे कवी सुदाम खरे व आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे मित्र, आप्तेष्ट व गावकरी यांनी यांचे कौतुक तथा अभिनंदन केले. आणि भविष्यात असेच कार्य कार्य करीत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.