ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना झालीच पाहिजे.प्रा.श्रावण देवरे

    129

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.6नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना करावी या जनगणने मधून शैक्षणिक, आर्थिक,सामाजिक परिस्थिती लक्षात येईल असे मत प्रा.श्रावण देवरे यांनी गंगाखेड येथे आयोजित ओबीसी समाजाच्या बैठकीत व्यक्त केले. ओबीसी एल्गार परिषदेचे मुख्य संयोजक गोविंद लटपटे यांनी या बैठकीचे आयोजन शहरातील शासकीय विश्रामगृहात केले होते.

    यावेळी गोविंद लटपटे,माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे,डॉ सुनिल जाधव,हरिहरराव वंजे,ॲड.भुजबळ,दिपक जाधव, गोविंद यादव,साधना राठोड आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ओबीसी समाजा समोरील भविष्यातील आव्हाने,मुलांच्या भवितव्याचा प्रश्न या प्रश्नावर विचार करण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र पणे त्यांना आरक्षण देण्यात यावे.

    असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.तसेच महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची जात निहाय जणगणना सर्व ओबीसी बांधवांनी केली पाहिजे अशी आग्रहाची मागणी करत सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे.असे आवाहन ओबीसी समाजाच्या नेत्यांना करण्यात आले.यावेळी लक्ष्मण लटपटे,विष्णू मुरकुटे,बालासाहेब पारवे, बालासाहेब सुर्यवंशी,माधव चव्हाण,रामेश्वर भोळे आदी उपस्थित होते.