वैचारिक दिवाळखोरी कशाला म्हणतात?

298

राजकीय चळवळीत काम करण्यासाठी खूप लोक उत्साहित असतात. त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्यासाठी तयार असतात. त्यासाठी त्यांना पद मिळाले पाहिजे. मग ते पक्षाचे संपर्क कार्यालय काढतील.लोकांच्या तक्रारी ऐकून घेतील अनेक समस्या सोडवतील.पद गेले की पक्षांतर आलेच मग सर्वच बदली होते. आदर्श, प्रेरणास्थान, विचारधारा आणि आचरण बदली करावे लागते.त्यात ही कमतरता दिसली की पुन्हा हकालपट्टी आलीच याला वैचारिक दिवखोरी म्हणतात.ही ब्राम्हण समाज सोडून बहुतेक समाजात मोठ्या प्रमाणत आहे. ब्राम्हण पक्ष संघटना बदली केली तरी मुख्य उद्धिष्ट व ध्येय सोडत नाही. कॉंग्रेस,भाजपा, शिवसेना, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, लेनिनवादी, समाजवादी आपणास वेगवेगळ्या विचारधारा दिसतात.पण जातीच्या शोषणाच्या, बलत्कार, हत्याकांडाच्या घटने बाबत यांचे राजकारण एकमताचे असते. ते पेपर मध्ये पत्रक काढून निषेध करतील आंदोलनाला पाठिंबा देतील म्हणजे त्यांची जबाबदारी संपली.

कामगारांचे शोषण दोन प्रकारे होते. हे कोणालाच मान्य नाही. बाबासाहेबांनी सांगितले होते. कामगारांचे दोन शत्रू आहेत.एक ब्राम्हणशाही दुसरी भांडवलशाही ही दोन्ही ठिकाणी शोषण करते. यासाठी कामगारांनी स्वताच्या विचारधारेच्या संघटना, युनियन बनविल्या पाहिजे आणि त्या सर्वांचा राष्ट्रीय पातळीवर महासंघ असला पाहिजे. त्यांचे नेतृत्व कामगार,क र्मचारी अधिकारी यांच्या मधीलच असले पाहिजे. राजकीय पक्षाचे असेल तर ते कामगारांना न्याय देऊ शकत नाही. कारण कामगार पक्षांना फंड देऊ शकत नाही.पक्षाला भांडवलदार फंड देतो म्हणूनच भांडवलदारांच्या विरोधात पक्ष भूमिका घेऊ शकत नाही. पहा वाचा गिरणी कामगारांचा इंटक आयटकचा लढा, आणि महात्मा फुलेच्या मार्गदर्शनाखाली रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांचा १८८४ ते १८९० चा गिरणी कामगारांचा लढा.वैचारिक दिवाळखोरी कशाला म्हणतात?.

सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय चळवळीत लोक ज्या उत्साहाने हिरीरीने भाग घेऊन काम करतात.तसे कामगार चळवळीत काम करतांना दिसत नाही.कोणती ही चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची आवश्यकता असते व तसेच मजबूत संघटन बांधणी करणे आवश्यक असते,यासंदर्भात मी अनेक फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा असणाऱ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यासोबत चर्चा करीत असतो. मात्र ते पारंपारिक पद्धतीनेच संघटन बांधणी करण्यात इच्छूक आहेत. सभा, संमेलन,आंदोलन व मोर्चा यावर लाखों रूपये खर्च करण्याची तयारी असणाऱ्या फुले- शाहू- आंबेडकर पक्षांकडे संघटन बांधणी करीता आर्थिक परिस्थिती नाही. अशी उत्तरे मला मिळाली. खरंतर या पक्षांना मनापासून संघटन बांधणी करण्याची इच्छाशक्ती नाही,असे खूप पाठपुरावा केल्यानंतर माझ्या निदर्शनास आले आहे.त्याची विविधांगी कारणे आहेत. तात्पुरती सभा, मेळावा, आंदोलन, मोर्चा यशस्वी करण्यासाठी निधी मिळविता येतो. पण कायमस्वरूपी पक्ष संघटना बांधणीसाठी निधी मिळवता येत नाही.हे न सुटणारे कोडे आहे.असो…

वैचारिक दिवाळखोरी कशी तयार होते त्यांचे उत्तम उदाहरण दीक्षा भूमीवर येवून केंद्रीय मंत्री मान.नितीन गडकरी दीक्षा घेतलेल्या बौद्ध समाजाला बौद्ध तत्वज्ञान समजवून सांगतील. हे म्हणजे उंटावरून शेळ्या मेंढ्या हाकण्यासारखे आहे. सकाळी रेशीम बागेतील आरएसएसच्या संघ शाखेत मनुवादी मनुस्मृती लागू करण्यासाठी काय केले पाहिजे यांचे मार्गदर्शन आणि नियोजन करायचे. यांची कल्पना दीक्षा भूमी स्मारक समितीचे संचालक आणि कमिटीच्या लोकंना नसावी येवढे महामूर्ख असतील काय?.तर निश्चितच नाही यांच्या मागचे कारण वैचारिक दिवाळखोरी हेच आहे.हे विकले गेले असावे असा अर्थ सरळ सरळ निघतो. गेल्या दहा वर्षांपासून आरएसएस विचारधारेच्या लोकांचा मानसन्मान वावर हेच सिद्ध करतो. जागतिक पातळीवर नागपुर हा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौध्द धम्म विचारांचा बाले किल्ला आहे अशी अधिकृतरीत्या नोंदणी होते. त्याच प्रमाणे मनुवादी विचारांचे नेतृत्व करणारी आर एस एस चा नागपुर हा बालेकिल्ला आहे हे चोरून लपवून सांगितल्या जाते. यालाच तर वैचारिक दिवाळखोरी म्हटल्या जाते.

नागपूरच्या दीक्षाभूमी वरील कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नसल्यामुळे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना बोलावणे योग्य नाही.तो जागतिक कीर्तीचा धम्म दीक्षा वर्धापनदिन असल्यामुळे धम्म चळवळीत काम करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या धम्म प्रचारक, अभ्यासक,विचारवंत भिख्खुंना आमंत्रित करणे अपेक्षित असते. हे होत नाही याला म्हणतात वातावरणाचा परिणाम,ज्या परिसरात आपण वावरतो,ज्या मित्रांसोबत आपण राहतो, त्यांचे जे काही संस्कार असतात ते संस्कार आपोआप आपण आचरणात आणतो. मग आपण मागे काय होतो, आपण काय काय केले, ते सर्व विसरत जातो, आणि शेवटी आपण एका विशिष्ट परिणामावर पोहचतो. खर म्हणजे नेता हा काही आपोआप घडत नसतो त्याला बऱ्याच वर्षाचा कालावधी लागतो आणि जे कार्य नेता म्हणून समाजासाठी करतो ते समाज हिताचे असेल तर नक्की समाजाने त्या नेत्याच्याा पाठीमागे राहयाला हरकत नसते. परंतु एखादा नेता अचानक बदलतो आणि समाज विरोधी भुमीका मांडतो तर अशा वेळे हा तळागाळाती समाज व कार्यकर्ता असतो, त्याने विचार करूनच त्या नेत्याची साथ सोडायला पाहीजे.कारण नेता हा कार्यकर्त्याच्या जिवावरच नेता असतो. मागे कार्यकर्ता नसला की नेता शून्य बनतो.

म्हणून मी आत्मचिंतन परीक्षण करून विनंती करून लिहित असतो. की कार्यकर्ता हा विचाराने परिपक्व असला व तो धम्माप्रती आदर राखणारा असला तरच तो अश्या नेत्याची साथ सोडून वैचारीकते कडे वळतो आपल्या राजकिय चळवळीचे अपयशाचे मुख्य कारण म्हणजे आपले नेते धम्मा पासून कोसो दूर असल्याने आपले आपल्यातच जमत नाही. आणि आपण एकमेकांचे ऐकुन पण घेत नसल्याने ही सर्व फसगत होते आहे.आपण दुस-या राजकिय पक्षांचा वैचारिक अभ्यास खूप करतो पण आपल्या वैचारिकतेच काय?. ते केव्हा एकत्र येतात आणि कसे एकजूटीने कामाला लागतात याचा तिळमात्र अभ्यास करीत नाही. मात्र आपण एकमेकांच्या कूरघुडी करण्यातच समाधान मानत असतो. ही आपल्या एकूण चळवळीच्या अधोगतीचे कारणे शोधून त्यावर उपाय योजना आखली पाहिजे.तेच होत नाही.

नागपूरच्या दीक्षा भूमीवर धम्मपीठा वरून केंद्रीय मंत्री मान.नितीन गडकरी काय बोलले आणि चंद्रपूर अकोला येथील धम्म मेळाव्यात इतर नेते काय बोलले.आर एस एस प्रणीत भाजपाचे राजकारण आणि धर्म एकाच नाण्यांचे दोन बाजू असतील तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण आणि धम्म एकाच नाण्यांच्या दोन बाजू का नसाव्यात?.बहुजन समाजाने विषमतावादी विचारांचे समर्थन करून वैचारिक दिवाळखोरी करू नये.तर समतावादी विचारांचे समर्थन करून समान न्याय,समान अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव देणाऱ्या विचारधारेचे ठामपणे समर्थन करावे त्यामुळेच भविष्यातील युवा पिढी गुण्यागोविंदाने नांदेल. म्हणूनच स्वार्थासाठी वैचारिक दिवाळखोरी थांबवा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप, मुंबई)मो:-९९२०४०३८५९