धनकेश्वर ग्रामपंचायत मध्ये प्रथमत वंचितच्या महिला सदस्य विजयी

151

🔹विजयी झालेल्या दोन्ही उमेदवारांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिध

पुसद(दि.7नोव्हेंबर):-शहरालगत असलेल्या धनकेश्वर ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पाच नोव्हेंबर रोजी पार पडली. त्याचा निकाल दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी रोजी जाहीर झाला असून धनकेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाने विजयाची पताका फडकवली असून या मध्ये एकूण पाच सदस्या पैकी 2 सदस्य निवडून आले आहेत.

यामध्ये प्रथमच वंचित च्या महिला सदस्य यांनी विजय प्राप्त केला आहे विजय झालेल्या उमेदवार शीला उत्तमराव मस्के यांनी 153 मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर सतीश सुदाम पडघने हे 116 मते घेऊन विजयी झाले आहेत. हा विजय प्राप्त झाल्याने एक प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात व पुसद तालुक्यातील परंपरागत बालेकिल्ला मध्ये वंचित बहुजन आघाडीचा अर्थात एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न उदयास येत आहे असे चिन्ह सर्वत्रिकडे दिसत आहेत. याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच होणार असल्याची चर्चा सर्वच मतदारांमध्ये होत आहे हे मात्र विशेष.

विजय झालेल्या दोन्ही उमेदवारांचा जाहीर सत्कार घेण्यात आला सत्कार समारंभास वंचित बहुजन आघाडीचे विविध कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे पुसद
तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, तालुका महासचिव उत्तमराव मस्के, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके, शहर अध्यक्ष जयानंद उबाळे, शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, शहर संघटक मधुकर सोनवणे, शहर महासचिव डॉ. अरुण राऊत, महिला आघाडीच्या विद्याताई नरवाडे,संघमित्रा कांनीदे, सुनंदा धबाले, कल्पना सावळे, सुपला निथळे, बेबीनंदा मुनेश्वर,कल्याणी पडघणे ,वनिता मस्के विशाल डाके, साहेबराव जाधव,पुंजाराम मस्के, लक्ष्मण कांबळे, प्रसाद खंदारे, राहुल धुळे, राहुल पडघणे
इत्यादी सहअसंख्य कार्यकर्ता पदाधिकारी गण उपस्थित होते.