डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथम शाळा प्रवेश दिनानिमित्त बार्टी च्या वतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे गंगाखेड मध्ये आयोजन

98

✒️अनिल साळवे( गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7 नोव्हेंबर):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथम शाळा प्रवेश दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व बार्टी समतादूत प्रकल्पाच्या वतीने विद्यार्थी समवेत प्रश्न-मंजूषा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी बार्टी प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी विद्यार्थी दिनाचे महत्त्व व बार्टीच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना सांगत बाबासाहेबांचा ज्ञानाचा,विद्याचा व्यासंग,अभ्यासाचा, निर्व्यसनीपणाचा,प्रज्ञा शील करुणेचा विचार आत्मसात करून मोक्याच्या जागा मिळवा त्यासाठी कष्टाचा मार्गाचाच अवलंब करावा असे सांगितले.

यावेळी पत्रकार शेख महमूद, राहुल साबणे,प्रकाश सिंगाडे,राजकुमार तिगोटे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाची पुस्तक देण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थी शिवराज खुळखुळे, दीपक कांबळे,आकाश मोरे,रणजित वावळे व बालासाहेब गायकवाड यांचा सहभाग होता.प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला एकूण ३०विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

याबरोबरच पंचायत समिती अंतर्गत स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री भरवण्यात आल्यामुळे या ही कार्यक्रमात महिलांना प्रश्नोत्तरे घेऊन प्रश्न-मंजूषा घेण्यात आली.या ठिकाणीही बार्टीच्या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली एकूण तीन महिलांनी बक्षिसे मिळवत माया नीलकंठ कांबळे, सुरेखा वाघमारे व श्यामला भोसले यांनी सहभागी होऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे घेतली. पंचायत समिती मधील कार्यक्रमालाही पंचायत समितीचे घनसावंत,उमेदच्या तालुका व्यवस्थापक रंजना हनवते,यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.