तहकूब ग्रामसभेत घेतले जातात ठराव-ठरावापासून जनता अनभीज्ञ!

223

 

 

महागाव तालुका प्रतिनिधि किशोर राऊत

 

शासनाने गावातील सर्वांगीण विकास व्हावा विकासापासून कुठलाही घटक वंचित राहु नये व प्रत्येकाला आपले मत मांडता यावे व सर्व जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणन्यासाठी व जनतेला आपले हक्क व अधिकार समजावे यासाठी शासनाने जनतेच्या सहभागासाठी ग्रामसभेला फार महत्व दिले आहे सर्व जनतेसमोर गावातील प्रश्न सुटण्यासाठी जनतेला महत्त्व देऊन जनतेच्या सहभागातुन विकास घेण्यासाठी ग्रामसभा हा सर्व हक्क अधिकराचा केंद्रबिंदु समजून गावातील जनतेला घेवून गावचा विकास होण्यासाठी ग्रामसभा सर्वोच्च समजून ग्रामसभा घेण्याचे ग्रा प ला अनिवार्य केले आहे दर तिन महिन्याला ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतने केलेल्या कामाचा लेखजोखा जनतेसमोर ठेवुन ग्रामस्थांची संमती व घेण्यासाठी ग्रामसभा हा जनता व ग्रामपंचायतचा दुवा समजला जातो परन्तु ग्रामपंचायतच्या असहकार धोरणामुळे व एककल्ली धोरणामुळे ग्रामसभेपासून दोन पावले लांबच राहण्याचे पसंत करीत आहे मौजा उटी येथे दर वर्षाला चार ग्रामसभा जरी घेण्याचा गवगवा करीत असले तरी दर ग्रामसभेला जनतेचा सहभाग नसल्याने उटी येथिल ग्रामसभेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे दर ग्रामसभेला जनता हजर राहण्याचे का टाळते ? याचे आत्मपरिक्षण ग्रा प सरपंच उपसरपंच सचिव यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्याची जबाबदारी असते परन्तु गेल्या चार वर्षापासून ग्रामसभेला ग्रामस्थ राहत नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्याशिवाय या पदाधिकार्यांना गत्यंतर राहिले नाही ग्रा प च्या सरपंच सचिव उपसरपंचांसह ग्रामसभेला कोरमशिवाय ग्रामसभा यशस्वी होत नाही हे ग्रामपंचायत पदाधिकारी यांच अपयश समजल पाहिजे ग्रामविकास व जनतेचा वैयक्तिक प्रश्न सुटण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन व त्यामध्ये सर्वांसमक्ष ठराव तसेच सरपंच उपसरपंच यांनी ठेवले व त्यास संमती देण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते मात्र एकाधिकारशाहिमूळे ग्रामसभा तहकूब करावी लागते याचे भान पदाधिकारी अधिकारी यांना असायला पाहिजे गेल्या चार वर्षात झालेल्या ग्रामसभा तहकुबच कराव्या लागल्या पदाधिकारी मात्र तहकूब ग्रामसभेतच आपल्या अधिकारात ठराव घेत असल्यामुळे जनता ग्रामसभेला उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करावी लागत असल्याने झालेले ठराव जनतेच्या पसंतीचे नसल्याने सरपंच उपसरपंच सचिव मनमानी पद्धतिने करभार करत असतील तर तो स्वैराचाराचा भाग म्हणावा लागेल ग्रामविकासाचे सूत्र हे ग्रामसभेने ठरवावे असा कायदा असल्याने या कायदयाला खूंटीला टांगून गावकारभार करने उचित पणाचे लक्षण नव्हे गावातील अभ्यासु कुठल्याही जाती धर्माच्या लोकाना सोबत घेऊन गावकारभार करण्याचे सोडून पदाधिकारी अधिकारी यांनी जनतेच्या हक्क अधिकारावर गदा आणने हे पदाधिकार्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे चार वर्ष्याच्या कलावधित कोरम अभावी ग्रामसभा तहकूब होणे व त्या तहकूब ग्रामसभेमध्ये ठराव घेणे एकाधिकारशाहिचे द्योतक आहे उटी येथे ग्रामसभा यशस्वी झाली नाही त्यावर पंचायत समितिच्या अधिकार्यांनी ठराव पाहुण प. स च्या अधिकार्यांनी ग्रामसभेला हजर राहुन जनतेमध्ये असणारा संभ्रम दूर करण्यासाठी हजर राहण्याची गरज आहे ग्रामसभा तहकूब असणाऱ्या गावावर शासनाने उपाययोजना करायला पाहिजे तहकूब ग्रामसभेमध्ये घेतलेले ठराव अमान्य करुन सरपंच उपसरपंच यांना कारणे दाखवा नोटिस बजावून ग्रामसभेला जनतेच्या नसलेल्या सहभागाविषयी जनतेमध्ये जागृति करणे काळाची गरज आहे