गुलामगिरी: श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत! [आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस विशेष.]

69

 

_इ.स.च्या १९व्या शतकापासून इंग्रजीत स्लेव्हरी- गुलामगिरी हा शब्द अमेरिकेतील गोऱ्या कातडीच्या माणसांनी काळ्या कातडीच्या माणसांच्या केलेल्या गुलामीबद्दल जास्त करून वापरला गेला आहे. सुरुवातीला गुलामगिरी केवळ अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमधेच नव्हती, तर उत्तर क्षेत्रातही होती. व्हरमाँट गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी प्रथम राज्य म्हणून अस्तित्वात आहे, सन १७७७मध्ये अमेरिकेने ब्रिटनमधून स्वतःला मुक्त केल्यानंतर ती सुरू झाली. तब्बल सात वर्षांनंतर सर्व उत्तर राज्यांनी गुलामगिरीवर बंदी घालण्याची शपथ घेतली. परंतु उत्तर प्रदेशात बरीच वर्षे गुलामगिरीचा अभ्यास चालूच होता. याचे उत्तर असे की, उत्तर अमेरिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली ज्यामुळे गुलामगिरीचे उन्मूलन तात्काळ करता आले नाही. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी मांडलेली ही ज्ञानवर्धक माहिती… संपादक._

पीबीएसने असे सुचवले की, पेनसिल्वेनियाने सन १७८०मध्ये गुलामगिरी क्रांतीदिनाच्या कायद्याची अंमलबजावणी केली, परंतु हळूहळू एक त्रृटी सांगण्यात आली. सन १८५०मध्ये पेनसिल्वेनियाच्या शेकडो बंदिवानांना बंधनात ठेवणे चालूच राहिले. सन १९६१मध्ये गृहयुद्ध सुरू होण्याआधीच एका दशकाहून अधिक काळापर्यंत उत्तर प्रदेशात दासत्त्व सुरूच राहिले. जगभरातून गुलामगिरी संपवण्यासाठी दरवर्षी २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा केला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली गुलामगिरी आजही या ना त्या स्वरूपात कायम आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये २ डिसेंबर रोजी गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. महिलांसाठी हा दिवस खुप खास आहे. सध्याच्या गुलामगिरीचा अंत करणे ही या दिवसाची मुख्य थीम आहे. यामध्ये मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, सक्तीचे विवाह, मुलांवर दबाव आणणे आणि शस्त्रांच्या शर्यतीत भरती करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हे सर्व प्रकार आधुनिक युगातील गुलामगिरीचे प्रतीक आहेत.
पार्श्वभूमी- २ डिसेंबर १९४९ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन स्वीकारण्यात आला. मानवी तस्करी थांबवणे आणि वेश्याव्यवसाय थांबवणे हा यातील मुख्य उद्देश होता. ठराव ३१७ (आयव्ही) दोन्ही गुलामगिरीचे प्रतीक मानून पारित करण्यात आले. गुलामगिरी म्हणजे वेठबिगार अशी गल्लत करू नका. गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक, क्रांतिकारी वा दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम आदींचा समावेश होतो. गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी, असा अंदाज आहे. मात्र एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमाणांपेक्षा अत्यल्प मानता येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जबाजारी झालेल्या नोकरांची आहे. अनेकदा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी आयात-निर्यात हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र भागच आहे. औद्योगीकरणाच्या आधी गुलाम आणि त्यांची श्रमशक्ती यांना आर्थिक दृष्टीने मोठेच महत्त्व होते. यंत्रयुगात मानवी श्रमांचे आर्थिक महत्त्व कमी होत चालले आहे. नोरबेर्त विनर म्हणतात, “यंत्रशक्तीमध्ये मानवी श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, पण गुलामगिरीत जी क्रूरता असते ती नाही.” १९व्या शतकाच्या सुरुवातीस गुलाम व भूदास ह्यांची संख्या लोकसंख्येच्या तीन चथुर्तांश होती. यंत्रयुगात प्रचंड प्रमाणावर मजूर लागत नाहीत त्यामुळे गुलामीचे आर्थिक महत्त्व निघून गेले आहे. गुलामी मात्र आर्थिक कारणांसाठी नाही तर मानवी हक्क म्हणून बेकायदेशीर केली गेली.
गुलाम हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सेवक असा होतो. नंतर तो बहुधा मध्ययुगीन काळात उर्दू व अन्य भारतीय भाषांमध्ये आला असावा, असा अंदाज बांधला जातो. संस्कृत भाषेत मात्र हा शब्द आढळत नाही, हे उल्लेखनीयच!
!! विश्व गुलामगिरी निर्मूलन दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


– संकलन –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर, गडचिरोली.
फक्त मोबा- 7775041086.