झिलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनतर्फे विविध मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार प्रदान

75

 

 

 

पुणे -झिलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनच्याब वर्धापन दिनानिमित्त व संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार 2023 कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष मेघराज राजे भोसले, सामाजिक कार्यकर्त्या स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी येरवडा कारागृहाचे माजी सेवानिवृत्त अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर,आंतरराष्ट्रीय चित्रकार शंकर गोजारे,झिलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा व राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार समारंभाच्या आयोजिका प्रेमीला तलवाडकर,आदर्श शिक्षक दादासाहेब पारखे,समुपदेशक प्रा . हरिनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना मेघराजराजे भोसले म्हणाले की झिलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनचे काम उल्लेखनीय आहे.संविधान दिनाच्या निमित्ताने सामाजिक पुरस्कार देणे म्हणजे संविधानाच्या मूल्यांचा गौरव आहे.
आपल्या भाषणात डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील म्हणाल्या की झिलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन चे काम अभिनंदनीय असून महिलांच्या कार्याला नक्कीच अशा पुरस्कारामुळे ऊर्जा मिळेल.
आपल्या भाषणात येरवडा कारागृहाचे माजी अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर म्हणाले की ,ज्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने संविधान लिहिले आहे तो उद्देश जर पूर्ण झाला नाही तर या सविधान दिनाचे महत्त्व राहणार नाही.
या पुरस्कारामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक राजाभाऊ भैलुमे,अध्यापिका डॉ.स्मिता सहस्त्रबुद्धे, सामाजिक कार्यकर्ते सूरज पाटील,अरुण निमकर्डे, विल पॉवर ह्युमनीटीज फाउंडेशन सामाजिक संस्था ,कवी व लेखक रणजित पवार ,सामाजिक कार्यकर्त्या लता
धायगुडे आशा वर्कर रोहिणी पारखे,स्वाती पारखे,अर्चना पन्हालकर,कर्जतच्या पोलिस पाटील, योगिता पारखे आदी 17 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कवी देवेंद्र गावंडे,कवी आनंद गायकवाड, कवयित्री मनीषा खामकर,कवी गणेश पुंडे,कवयित्री लुबना शेख यांनी सविधानावरील कवितांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेमीला तलवाडकर यांनी केले .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजेंद्र सगर व सुशील कांबळे यांनी केले.