जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनुप कोहळे द्वितीय

64

 

गडचिरोली :: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली च्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान घेण्यात आलेल्या (कथालेखन) स्पर्धेत अनुप वसंत कोहळे मु. राजनगट्टा, ता. चामोर्शी येथील युवक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
12 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवाची ही निवड चाचणी असून अनुप कोहळे यांची आता विभागस्तरीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अनुप कोहळे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते 2 हजार रुपयाचा धनादेश आणि सन्मान पत्र देऊन देऊन सत्कार करण्यात आला. पुढील स्पर्धा ही विभागीय स्तरावर 5 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येते पार पडणार आहे.