उमरखेड तालुक्यातील कृषी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना फसविण्याचे अनेक यशस्वी प्रयोग

120

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 3 डिसेंबर) सध्या खरीप हंगाम हा शेतकऱ्याना मनावा तसा पिकला नाही आणि जेवढा तो पिकला तेवढ्या प्रमाणात विकून रब्बी हंगामाची तयारी करीत असताना उमरखेड तालुक्यातील व आजूबाजूच्या ढाणकी, विडूळ, मुळावा तसेच खेडेगावातील शेतकऱ्यांना लूटण्याचा मार्ग कृषी केंद्र चालक शोधताना दिसत आहेत.आणि अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सर्वकाही अलबेल सुरू असल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे.

रासायनिक खते व बियाणे औषधी दुकान विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना पिळून खाण्याचा व लुटण्याचा जणू तालुक्यात, शहरात चंगच बांधला आहे.

अशी चर्चा शेतकरी बांधवांकडून होत आहे शेती उपयोगासाठी लागणाऱ्या अनेक कंपन्यांच्या औषधांना बाजारात विक्रीसाठी परवाना देण्यात आला आहे परंतु तालुक्यातील कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक औषधी यांच्यासोबत इतर जादा नफा असलेली व दुय्यम कंपनीचे परवाना ओ फार्म नसलेली औषधी व टॉनिक विविध खतांच्या नावाखाली देऊन मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना फसविण्याचे काम सुरू आहे.

या गंभीर प्रकाराकडे कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, गुण नियंत्रण अधिकारी पंचायत समिती उमरखेड, यांचे साप दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून वर्तविल्या जात आहे जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा मोहीम अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद यवतमाळ, यांचे तालुक्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी कृषी केंद्र चालकाची पाठराखन करत असल्यामुळे शेतकरी बांधवांना दुय्यम परवाना असलेल्या औषधी विकत घ्याव्या लागत आहे अशी औषधे विकून व्यापारी वर्गाची चांदी तर शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात आर्थिक हानी होत आहे ही आर्थिक हानी थांबेल का? तसेच उमरखेड येथील कृषी अधिकारी कृषी केंद्र तपासणी करण्याकरता तालुक्यातील शहरात आले असता विशिष्ट अशा धनाड्य कृषी केंद्र चालकाला बगल दिल्या जाते त्यांच्या कृषी केंद्राची सुद्धा तपासणी व्हायला पाहिजे ते का होत नाही हे न उघडणारे कोडेच आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

तेव्हा गोपनीय खातेनिहाय गुप्तपणे चौकशी करून नियमानुसार सर्व औषधी विक्री करण्यासाठी कायद्याचा बडगा उगारून दोषींवर परवाना निलंबनाची कारवाई होईल का? अन्यथा दोषीला कारवाईच्या बडग्यापासून वाचविले जाईल का? असा प्रश्न शेतकरी बांधवांकडून उपस्थित केल्या जात आहे. यामुळे संबंधित कृषी अधिकारी व कृषी सेवा केंद्र चालकात काही आर्थिक देवाणघेवाण तर झाली नाही ना?? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे तेव्हा आधीच निसर्गाच्या व कृपेमुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट थांबेल का असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडतो आहे.