एकनिष्ठा फाउंडेशनला भटिंडा पंजाबला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

    78

     

    दिनांक 05/12/2023
    खामगांव :- येथील सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशनला राष्ट्रीय स्तरावर नेशनल सेव द ह्युमैनिटी अवॉर्ड नी सन्मानित करण्यात आले. ही संस्था खामगांव बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये रक्तदान, बेवारस, दिव्यांग गरजू वंत रुग्ण लोकांना उपचारासाठी आर्थिक मदत व तसेच गौ -सेवा कार्यात अविरत सेवा देत आहे. या कामाची दखल पंजाब राज्यामधील भटिंडा शहरामध्ये दिनांक 2 डिसेंबर रोजी आयोजित सन्मान समारोह मध्ये घेण्यात आली. या सन्मान समारोह नेपालसह भारत देशातील संपूर्ण राज्यातील 200 संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दयालसिंह सोढी आणि भटिंडाचे लाडके आमदार जगरूप सिंह होते. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला हे पुरस्कार हेल्प निडी फाउंडेशन संस्थापक आनंद जैन सर यांनी भारतात रक्तदान क्षेत्रात निःस्वार्थ रक्तसेवा देणाऱ्या रक्तदात्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथील सुरज शिवमुरत यादव यांना राष्ट्रीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले एकनिष्ठा फाउंडेशनचे रक्तनायक गोपाल धोटे, योगेश राऊत, सुनिल कौलकर, सतिष धोटे भटिंडा पंजाब येथे रक्तदान केले. यांचा सुद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकनिष्ठा फाउंडेशन 2013 पासून रक्तदान क्षेत्रात कार्य करीत आहेत पुढे जात असतांना 29 डिसेंबर 2013 रोजी सुरज यादव यांनी एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशनची स्थापना केली. एकनिष्ठा फाउंडेशन पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते कोणत्याही रुग्णाला रक्त मिळाले नाही म्हणुन दगाऊ नये यासाठी काम करत असतात आता पर्यंत एकनिष्ठा रक्तदात्यांची अविरत नि:शुल्क सेवा सुरू आहे व सुरू राहणार एकनिष्ठा फाउंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला यांचा सर्व श्रेय मी माझ्या मिञ मंडळी टीमला देतो व भविष्यात पण आपली अशीच साथ राहील ही अपेक्षा करतो अशी माहिती योगेश राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.