प्रा. प्रफुल मनोहर राजुरवाडे आचार्य पदवीने सन्मानीत

    133

     

     

    सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो.8605592830

     

    *चिमूर* /- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ऐतिहासिक अध्ययन ( कालखंड-1920-200) या विषयावर सादर केलेल्या प्रबंधांस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना नुकतीच विद्या वाचस्पती पी. एच डी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे.

    या विषयातील ज्ञात अज्ञात आंबेडकरी व आंबेडकरोतर कार्यकर्त्याच्या मुलाखती घेऊन त्यांचे चळवळीतील कार्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या संशोधनाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. त्यांचे मार्गदर्शक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बि आर मस्के शासकीय विदर्भ ज्ञान- विज्ञान संस्था अमरावती हे होते. या मौखिक परीक्षेचे परिक्षक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील डॉ. राहुल वरवंटीकर होते. तसेच शासकीय विदर्भ ज्ञान- विज्ञान संस्था अमरावती चे प्राचार्य तथा शिक्षण सहसंचालक डॉ उमेश काकडे डॉ. संतोष बन्सोड सिनेट सदस्य तथा समन्वयक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, अमरावती विद्यापीठ डॉ भांडारकर डॉ. मस्के प्रा डॉ. उमा चाफले डॉ घनश्याम महाडिक डॉ. सातभाई प्रा मेंढे तसेच इतर संशोधक पदव्युत्तर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

    त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील दैदीप्यमान यशाबदल गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दिपक यावले, सचिव विनायकरावजी कापसे, प्राचार्य डॉ अश्विन चंदेल तसेच सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.