स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करूणा धनंजय मुंडे यांच्याकडून बडे कुटुंबाला पाच हजारांची मदत

174

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.17डिसेंबर):-धारूर तालुक्यातील कासारी बोडखा या गावातील लक्ष्मण माणिक बडे या नवतरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्याची समजतात स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करूणा धनंजय मुंडे यांनी बडे कुटुंबाला सांत्वन पर भेट देऊन 5 हजार रुपयेची मदत केली आहे. भेट दिल्यानंतर गावामध्ये असलेलं विदारक दुःख सर्वांच्या समोर आलं, एखाद्या घरातला करता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या मागे कुटुंब उघड्यावर ती पडलेलं नजरेस भावलं मयत लक्ष्मण माणिक बडे यांच्या पश्चात दोन मुले, आई व पत्नी असा परिवार आहे.

हा परिवार उघड्यावर पडलेला पांढरा परिवार नजरेस आला या विदारक दुःखाला कारणीभूत कोण?? दोन एकर माळरान जमिनीवर या परिवारांना जगायचं कसं हा प्रश्न पडतो आणि खऱ्या अर्थाने करूणा दाखवत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करूणा धनंजय मुंडे यांनी या परिवाराला पाच हजारांची मदत केली आहे. तसेच मयताच्या आईने तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही फेरफारचे काम केले जात नव्हते. करूणा मुंडे यांच्याकडे हा विषय मांडताच करूणा मुंडे यांनी काम न करणाऱ्या अकार्यक्षम तलाठी आलुरे मॅडम यांना फोन करून तात्काळ फेरफारचे काम करायला सांगितले आणि ते काम मार्गी लावले.

आणि विशेष म्हणजे बडे कुटुंबाला विमा देखील देखील भेटला नाही. गरिबांचा वाली कोण? हा प्रश्न व्यवस्थेला पडलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न करूणा मुंडे यांनी स्वतः च्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या ठेवलेला आहे. आणि असे आवाहन देखील केले आहे की. बडे परिवाराला तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, व्यवसायिक आणि प्रशासकीय लोकांनी सरळ हाताने आर्थिक मदत करावी.यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष अजयकुमार देडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धारूर तालुकाध्यक्ष प्रशांत बडे, तसेच कासारी बोडखा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते