नौकरी मेळावा युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट – आ.डॉ.गुट्टे

80

🔸पूर्णा येथे उद्घाटन : युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसादत गडे नियोजन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17डिसेंबर) :-शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार मिळून आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी तसेच त्यांच्यातली नकारात्मकता दूर व्हावी, या हेतूने युवा उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान आयोजित हा नौकरी मेळावा इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून सहभागी उमेदवारांनी मुलाखतीला आत्मविश्वासाने व संयमाने सामोरे जावे, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

शहरातील सुमन मंगल कार्यालय येथे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने युवा उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित नौकरी महोत्सव सीझन टूचे भव्य उद्घाटन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यामध्ये तब्बल ८० कंपन्या सहभागी झाल्या असून जवळपास ६ हजारांहून अधिक नोकरी इच्छुकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच गर्दीचा महापूर उसळला होता.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आयुष्यात संधी खूप असतात. मात्र, तिथपर्यंत पोहोचणे खूप महत्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने किमान एक तरी कौशल्य आत्मसात करावे, आधुनिक तंत्रज्ञान व विविध ॲप्सचा वापर करून युवकांनी तंत्रज्ञानपूरक व्हावे. मुलाखत दिल्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करा. आपण कुठे कमी पडलो? हे तपासा आणि त्या चुका पुढच्या वेळी दुरुस्त करा. या मेळाव्यात नोकरीच्या चांगल्या संधी मिळतीलच. मात्र, ज्यांना संधी मिळणार नाही. त्यांच्यासाठी पुढच्या वेळेसाठीचा चांगला अनुभव व आत्मविश्वास या ठिकाणी निश्चितच मिळेल. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांना यापुढेही प्रयत्न करीत राहाणे गरजेचे आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासून होत असलेल्या या मेळाव्यात राज्यभरातील तब्बल ८० कंपन्या आणि हजारो युवक व युवती सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे हजारो उमेदवारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. अशाच उदात्त हेतूने गतवर्षी घेतलेल्या दोन दिवसीय रोजगार मेळाव्यास भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदा त्याही पेक्षा तगडे नियोजन माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केले आहे. परिणामी, अतिशय नियोजनबद्ध स्वरूपात नौकरी मेळावा होत आहे. युवा पिढीला नोकरीच्या संधी चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी ६ हजार पैकी १२७४ उमेदवारांना रोजगार मिळाले होते. यंदाही तब्बल ५९०० इच्छुकांनी नावनोंदणी केली असून भरपूर उमेदवारांना सक्षम रोजगार मिळेल, याची मला खात्री आहे, असे मुख्य आयोजक सुनील रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.

यावेळी मुख्य आयोजक सुनील रत्नाकर गुट्टे, तहसीलदार माधव बोथीकर, गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, बापूराव घाटोळ मामा, नंदकुमार डाखोरे, चांदा मामा बोबडे, ॲड.डाखोरे, प्रभारी सुभाष देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, सुनील डुब्बेवार, तालुका अध्यक्ष गणेश कदम, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, उत्तमराव ढोणे, हरिभाऊ कदम, बखाल मामा, गीताराम देसाई, श्रीराम सातपुते, अनिरुद्ध शिंगाडे यांच्यासह सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी, पत्रकार, सहभागी युवक, युवती, पदधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुनील भैय्या गुट्टे यांच्या नियोजनाचे कौतुक!
सुनील याने गेले काही महिने प्रचंड मेहनत करून राज्यातील व राज्याबाहेरील तब्बल ८० कंपन्या एकाच व्यासपीठावर आणून युवा पिढीसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. मुलगा म्हणून नव्हे, तर एक युवक म्हणून त्यांनी घेतलेले कष्ट व नियोजनाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गौरवोद्गार काढले.