नंदारा येथील नवीन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण

    37

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर (३१जुलै) – पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या नंदारा येथील नवीन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण जि. प. सदस्य गजानन बुटके यांचे हस्ते करण्यात आले.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती चिमूरच्या सभापती लताताई पिसे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणुन पंचायत समिती चिमूरचे उपसभापती रोशन ढोक, प. स. सदस्य शांताराम सेलवटकर, सरपंच सुनीताताई गायकवाड, ग्रा. प. सदस्य संगीताताई गायकवाड, नंदारा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक गजभिये आदी उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यात गावकर्यांच्या सहकार्याने व उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.