जनशक्ती संघटनेचा अंगणवाडी सेविकांच्या बंदला पाठिंबा

199

✒️सोलापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सोलापूर(दि.10जानेवारी):-नागेश खुपसे-पाटील(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी) अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून राज्यभर अंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे. अंगणवाड्यांना टाळी ठोकून राज्यातील लाखो मदतीस सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. तरीही निरडावलेले शासन अजूनही स्वस्थ आहेत. लहान पिढी घडवून देशाचे भविष्य उज्वल करणाऱ्या या ताईंना सरकार जाणीवपूर्वक त्रास देत आहे. त्यामुळे याबाबत सरकारने सकारात्मक राहून विचार करण्याची गरज असल्याचे सांगून अंगणवाडीच्या संपात जनशक्ती संघटना सोबत असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केले.

अंगणवाडी,मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस दि.०४ फेब्रुवारी २०२३ पासून शासनाच्या विरोधात मागण्या मान्य कराव्यात यासाठी संप पुकारला आहे. आजपर्यंत शासनाने कोणतीच दखल घेतली नाही किवा आमचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा केली नाही. सेविका अनेक वर्ष अंगणवाडीत काम करत आहेत. परंतु शासन तुटपुंज मानधन देत आहे व त्यासाठी त्या दिवसभर काम करत असतात,यासाठी जनशक्ती संघटनेने आज जिल्हा परिषद पुणे येथे उपस्थित राहून पाठींबा दर्शवीला आहे.

अंगणवाडी ताईंचा संप मोडकळीस आणण्यास शासन विविध प्रकारे दडपशाही करत आहे. परिणामी अंगणवाडीतील पोषण आहार वाटप करण्यासाठी आपल्या यंत्रणेचा उपयोग करणे चालू केले आहे. ही हुकूमशाही पद्धत असल्याचा घानाघात खूपसे यांनी केला. अंगणवाडी ताईंच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्यांचा विचार राज्य सरकारने त्वरित करायला हवा. देशाचं भविष्य घडविणाऱ्या महिलांना रस्त्यावर आणण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप त्यांनी शेवटी केला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणू नका – अंगणवाडी सुरू करावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर शासन करू पाहत आहे. मात्र त्यांच्यावर कोणताच दबाव आणू नका, लोकशाही पद्धतीने ते आपल्या मागण्या मागत आहेत. आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर जनशक्ती संघटनेच्या विरोधात उतरण्याची तयारी ठेवा असा गर्भित इशारा अतुल खूपसे पाटील यांनी दिला.