साताऱ्यात २२ जानेवारी रोजी मतदान यंत्रची प्रेत यात्रा काढण्याचा निर्धार

337

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.10जानेवारी):- छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यातून क्रांती होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने ई. व्हि. एम. हटाव आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी साताऱ्यातील राजवाडा ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मतदान यंत्रची प्रेत यात्रा लोकशाही मार्गाने श निघणार असल्याची माहिती पद्मश्री लक्ष्मण माने, विजय मांडके, संजय गाडे, ॲड. वर्षा देशपांडे,भरत लोकरे, अरुण जावळे, प्रमोद क्षीरसागर, शाहीर प्रकाश फरांदे, वैभव गवळी, ॲड. शैला जाधव यांनी दिलेली आहे.

सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पद्मश्री माने यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील भानू प्रतापसिंग आणि देशभरातील वकिलांनी गेले चार दिवस नवी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबविणारी यंत्रणा व इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करता येते. याची प्रात्यक्षिका दाखवून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारंपारिक पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. असा संदेश दिलेला आहे. पूर्वी पॅट मशीन वरती १४ सेकंदाचा कालावधी असल्यामुळे मतदारांना विचार करता येत होता. पण, आता फक्त सात सेकंदामध्ये मतदान प्रक्रिया म्हणजे ईव्हीएम मशीन वर बटन दाबल्यास ते मत भाजप या चिन्हावर जात असल्याने लोकशाही धोक्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर एकतर्फी संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचे सिद्ध झालेले आहे. ही मतांची चोरी असून भारताची लोकशाही व संविधान धोक्यात आलेली आहे. त्यामुळेच तर गेली नऊ वर्षांमध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळत असल्याचे आरोपही करण्यात आले.

निवडणूक आयोग घटनेनुसार स्वायत्त आहे. पण त्याचे स्वायत्तता काढण्यात मोदी सरकारने हित जोपासले आहे. निवडणूक आयोगाचे नेमणूक पंतप्रधान कॅबिनेट मंत्री व विरोधी पक्ष समिती करत होते असे आता चित्र दिसत असून लोकशाही धोक्यात आलेले आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात बोलणाऱ्याला कोणतेही स्थान न देता हुकूम पद्धतीने कामकाज सुरू आहे. आतापर्यंत १८ लाख ९४ हजार२४ ईव्हीएम मशीन गायब तर १७ लाख ६ हजार ५० यंत्रणा खराब झालेले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना प्रतिसाद दिला जात नाही २०२५ रोजी जातीयवादी शक्ती असलेल्या राष्ट्रीय स्वयं संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहे.

या शतक महोत्सवात हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची चाल खेळली जात आहे. असे आरोप करण्यात आला यामुळेच या गोष्टीचा निषेध करण्यासाठी साताऱ्यातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी साताऱ्यातील राजवाडा चौकापासून ईव्हीएम मशीनची प्रेत यात्रा काढण्याचा निर्धार केलेला आहे. यामध्ये पद्मश्री लक्ष्मण माने, ॲड वर्षा देशपांडे, संजय गाडे, विजय मांडके भरत लोकरे, प्रमोद शिरसागर ,अरुण जावळे, बाळासाहेब शिरसाठ, प्रकाश फरांदे ,संजय गाडे, धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.