पीक विमा भरण्यासाठी मिळाली 5 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ

24

🔸कांग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिली माहिती

✒️परळी आतुल बडे (प्रतिनिधी)मो:-9853851717

परळी(दि.31जुलै):-देशामध्ये सर्व स्तरांवर शेतकरी आपल्या स्वतः पिकाचा पिक विमा सेवा केंद्रावर जाऊन भरत आहे ,अनेक अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे केंद्र सरकारने पिक विमा भरण्याची मुदत वाढ राज्य सरकारने मागितली होती या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदत वाढ 5 ऑगस्ट पर्यंत पिक विमा भरणे भरण्यासाठी मिळाली, याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे.

   अनेक शेतकरी सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे व कोरोना लॉक डाऊन मुळे कागदपत्रे मिळत नसल्यामुळे सेवा केंद्रावर विमा भरताना अडचणी निर्माण झाल्यामुळे देशातील सर्वच राज्याने केंद्राकडे पिक विमा शेतकऱ्यांना भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती त्यामुळे केंद्र सरकारने आज दिनांक 31 जुलै 20 20 पंतप्रधान पिक विमा योजनेचे भारत देशाचे कृषी विभागाचे सहसचिव डॉक्टर आशिष कुमार भुतानि यांनी भारत सरकार कडुन आदेश पारित केले आहेत यामध्ये पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली आहे तरी शेतकरी बांधवांनी सेवा केंद्रावर पिक विमा असे आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केले आहेत.