शर्मिला शानेदिवाण यांना राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार प्रदान

122

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.17जानेवारी):-गुरुदेव विद्यानिकेतन, कोल्हापूर येथील कृतिशील शिक्षिका, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला शानेदिवाण यांना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट व आम्ही भारतीय महिला मंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा व नावाजलेला राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत विश्वास सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके असे आहे.

यावेळी जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, ज्येष्ठ कवयित्री डॉ. स्मिता गिरी, संवाद प्रकाशनाच्या प्रमुख डॉ. शोभा चाळके, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनसेवेच्या क्षेत्रात शर्मिला शानेदिवाण गेली 30-35 वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. शर्मिला शानेदिवाण सुप्रसिद्ध लेखिका आशा अपराध यांच्या कन्या असून त्यांना राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.