राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे यश

223

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.29जानेवारी):-शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर आणि  सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड. यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य स्व. संभाजीराव देसाई राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज , कराड मधील बी.ए. भाग एक मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा संजय जाधव हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत राज्यभरातील विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ‘रानकवी ना. धो. महानोर’  या विषयावर कु. प्रतीक्षा हिने निबंध लिहिला होता. 

तिला या स्पर्धेत सहभागासाठी प्रा. सौ. एस. पी. पाटील, प्रा. पी. एस. चोपडे यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्लासाहेब,  संस्थेचे सन्माननीय सदस्य व विश्वस्त मा. श्री. अरुण पाटील (काका), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.