तारे जमीन पर या सांस्कृतिक कार्यक्रमात मांडवा शाळा केंद्रातून प्रथम

198

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29जानेवारी):-पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या केंद्र सावरगाव (बंगला) येथे पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनिल नाईक मित्रमंडळ व शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने तारे जमीन पर या केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुब खान पठाण हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष सरगर, विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण ,विनायक भांगे, केंद्रप्रमुख मनोज रामधनी, मुख्याध्यापक,तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख मनोज रामधनी यांनी केले.या कार्यक्रमात केंद्रांतर्गत १६ शाळेपैकी १२ शाळेनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मांडवाने माँ तुझे सलाम या गाण्यावर नृत्य करीत प्रथम क्रमांक पटकाविला.

यामध्ये विवेक आबाळे,राज आडे,आर्यन राठोड,आर्यन जाधव,आर्यन ढोले,साहिल ढोले,जैतिक राठोड,दुर्गेश आडे,लालसिंग राठोड,आणि मुख्य भूमिकेत प्रसाद वाकोडे या विद्यार्थ्याने सहभाग घेतला व त्यांना बी आर कोचिंग क्लासेस मांडवा संचालक बजरंग राठोड मार्गदर्शन करित आहेत. तालुकास्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर चांदेकर , बापुराव पाईकराव यांनी केले व आभार सतिष सुडके यांनी मानले.