I.A.S बनुन करायची आहे प्रशासकीय सेवा-कु.शेजल दिनेश क-हे

26

🔸धारणीच्या कु.शेजल दिनेश क-हे नी मिळवीले दहावीत 97.80 टक्के गुण

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.1ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा वतीने नुकताच दहावी चा निकाल घोषित झाला असुन, त्यात धारणीच्या किड्स केअर इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी कु. शेजल दिनेश क-हे ने घवघवीत यश संपादित करत 97.80 टक्के पटकावीले.
शेजल ला भविष्यात I.A.S अधिकारी बनुन प्रशासकीय सेवा करायची आहे.
तीचे वडील हे शिक्षक असुन आई ही ग्रृहिनी आहे,
ती आपल्या यशाचे श्रेय तीचे वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री. दिनेश भगत सरांना देत आहे.
तिचे या यशामुळे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे.