सुधाकर बनसोड धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित

92

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12फेब्रुवारी):-महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती वडफळी वटफळा तालुका नेर जिल्हा यवतमाळ अध्यक्ष प्रा.भंदत सुमेध बोधी महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये २ व ३ फेब्रुवारीला १२वी बौद्ध धम्म परिषदेचे राजश्री शाहू मैदान येथे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये पुसद तालुक्यातील ग्रीन पार्क१ श्रीरामपुर पुसद येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद सेवानिवृत्त प्राचार्य सुधाकर बनसोड यांना त्यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.