स्मार्ट व्हिलेज कडून १० हजार विद्यार्थ्यांना सहज शिक्षा लर्निंग ॲप मोफत

39

🔸संस्थापक प्रकाश बाळबुध्दे यांचा पुढाकार

✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

साकोली(दि १२ फेब्रुवारी):-येथील स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने प्रकाश बाळबुद्धे यांच्या संकल्पनेतून भंडारा जिल्ह्यातील जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना प्रति सात हजार रूपये किंमतीचा सहज शिक्षा लर्निंग ॲप मोफत देणार आहेत.

इयत्ता ५ वी ते १० वीच्या ग्रामीण व शहरी भागातील इंग्रजी व मराठी माध्यमांमधील दहा हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षाकरीता महत्वाचा अभ्यासकम अगदी मोफत पुरवून सामाजिक बांधिलकीचा परिचय देत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून डिजिटल भारताचा संकल्प घेऊन विद्यार्थ्यांना सहज व सोप्या पध्दतीने शिक्षण विनामूल्य उपलब्ध केले जाणार आहे. यात अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ग्राफिक्स नसल्याने लक्ष विचलित न होता यातून विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहेत, वारंवार घेतल्या जाणाऱ्या टेस्टमुळे गुणवत्ता देखील सुधारणार आहे. यात गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी प्रकाशपर्व, पोस्ट ऑफिसच्या मागे, साकोली, ता.साकोली, जि. भंडारा या पत्त्यावर फोन नं. ८०१०८६११७४ वर संपर्क करून नोंदणी करा असे आवाहन प्रकाश बाळबुद्धे यांनी केले आहे.