हयात प्रमाणपत्रा साठी निराधार , आणि म्हाताऱ्यांची धडपड

150

🔸बँक व तहसील मध्ये जाण्यासाठी नागरिकांचे हाल

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निराधार नागरिक म्हातारे, विधवा,दिव्यांग,परितक्ता या नागरिकांना मानधन मिळत असल्यामुळे गंगाखेड तहसील मध्ये तहसील प्रशासनाची नियोजन नसल्यामुळे,म्हातारे, निराधार,विधवा,दिव्यांग,परितक्ता यांना धडपडीचा सामना करावा लागत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत असताना प्रतिवर्षी,प्रत्येक महिन्यात सर्व नागरिकांना मानधन देण्यात येत असतानाच मार्च एंड च्या पूर्वी मानधन अनुदान उचलणारे नागरिक जिवंत असतील तर त्यांचे हयात प्रमाणपत्र प्रतिवर्षी घेण्यात येत असते ज्या नागरिकांचे हयात प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना विभागाला दिले अशा नागरिकांना प्रति महिन्याचे मानधन बँकेकडे पाठवले जाते.

हया/जिवंत असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी म्हातारे,निराधार यांची गंगाखेड तहसील मध्ये होत असलेली कासावीस पाहता संबंधित बँके चा सही शिक्का घेऊन तहसील कार्यालयामध्ये देण्यासाठी एकच गर्दी होत असताना दिसून येत आहे.

संजय गांधी निराधार योजना विभागात कर्मचारी संख्याबळ कमी असल्यामुळे कर्मचारी वर्गाची सुद्धा कासावीस होत असल्यामुळे.हयात प्रमाणपत्र करिता पर्यायी व्यवस्था करावी व प्रशासनाच्या वतीने निराधारांची धडपड थांबवावी असे नागरिक बोलत होते.