बालकांच्या प्रश्नाचा वास्तव वाद!

58

प्रत्येक कालखंडामध्ये आणि प्रत्येक राष्ट्रांमध्ये मुलांचे भवितव्य हे नेहमी अधांतरी असते. मुलंही वर्तमानाच्या आणि भविष्याच्या समस्याला सामोरे जात असतात. त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी विचार करणाऱ्या अनेक संघटनांचे काम हे मौलिक वाटते .मूल समस्या मुक्त व्हावे मूल संभाव्य संकटांना बळी पडू नये. अशी दक्षता घेणार समाज मोठ्या प्रमाणात तयार होणे ही समाज शहाणपणाची आणि संस्कृत तेची गोष्ट आहे.

2024 मध्ये मुलांचे आभासी ऑनलाइन चे जग हे संकटग्रस्त बनले आहे. या जगातून पुढे जात असताना मुल वाचवले पाहिजे असा विचार क्वचितच आशिया भारतीय नागरिकांच्या मनामध्ये येतो आहे दुसऱ्या बाजूला जगभर मुलांच्या आभासी जगातील मानसिक समस्या बद्दल खूप विचार चालू आहे. त्यामध्ये आभासी जगातील मुलांच्या समस्या त्यांना करावा लागणारा सामना तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या सोई प्लॅटफॉर्म व डिजिटल कंपन्यांची जबाबदारी आणि या कंपन्यावर दबाव टाकून त्या कंपन्यांनी उपाययोजनात्मक साधनांमध्ये करावयाचे बदल याबद्दल ही विचार चालू आहे. यासाठी सरकार म्हणून काही जबाबदारी पार पाडायचे असते. हे सरकारला दाखवून देण्याची गरज आहे. सरकार व दबाव टाकण्याची गरज आहे .हा दबाव या प्रश्नाची तीव्रता कळाली तरच तयार होईल. दबाव गटानी प्रयत्न करण्याची गरज असून मुलांचे निरामय मानसिक जीवन तयार करण्यासाठी अत्यंत सामूहिक प्रयत्न महत्वाचे आहेत. म्हणून तर मेटा या कंपनीच्या व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक झुन केंन बर्ग यांना या प्रकरणी त्यांना माफी मागावी लागली. केवळ हा प्रश्न एका कंपनीपुरता नाही. तर टिक टॉक स्नॅपचॅट बिग टेक या सर्व कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा सुविधांमध्ये मुलांचे मानसिक अश्लील वर्तनाच्या उत्प्रेरक दृश्याच्यामुळे लैंगिक भावनांचा होत असलेला विस्फोट ही समस्या नव्याने उफाळून आली आहे. थोडक्यात मुलांचे लैंगिक शोषण या समस्येवर कोणता उपाय करायचा ऑनलाइन च्या आभासी माहितीमुळे मुले या साधनाची बळी गेली आहेत या मुलांना कसे वाचवायचे हा प्रश्न तीव्रतेचा बनला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी जगभर विचार चालू आहे आंदोलने चालू नाहीत तर ऑनलाइनच्या सुविधेमध्ये सुरक्षिततेचे उपाय कंपन्यांनी तयार करावेत आणि मुलगा सुविधेचा प्लॅटफॉर्म बाजारात आणावा हे जर केले नाही. तर उपाययोजनांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज मुले या भावनांची बळी मोठ्या प्रमाणात जात आहेत यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने अहवाल नुकताच प्रकाशित केलेला आहे .आभासी जगातील मुलांचे लैंगिक शोषण हा अहवाल सर्वच पालकांनी समजावून घेणे महत्त्वाचे त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे, की जगात तयार केलेले दृश्य प्रतिमांचे भावनिक जग हे इच्छा वासना कामना चाळवते त्यातूनच नवतरुण मुले मानसिक दृष्ट्या बळी जातात आणि त्यांचा निकोप भावनांक हा विकसित होत नाही. ही समस्या असून ती सोडवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तंत्र साधनांच्या मध्ये अंतर्भूत उपाययोजना सुरक्षिततेचे उपाय हे तयार करण्याची गरज आहे विशेषतः ग्राफिक्स सेक्सुअल कंटेंट बुली लाईन लैंगिक छळ या सर्व समस्या आहेत. परंतु बाल जगताला हे सगळे आभासी वातावरण सत्य आणि वास्तव वाटते या समस्येला मुले मोठ्या प्रमाणात जगभर बळी पडत आहेत. सर्व कंपन्यांच्या आभासी दृश्य जगामध्ये या प्लॅटफॉर्मवर हे मोठ्या प्रमाणात दाखवले जाते मुले पाहत आहेत आणि त्यामुळे उत्तेजित वर्तनाचे व्यक्तिमत्व आपलेही असावे असा एक विकार या आभासी दृश्य जगाचे बळी जाऊन त्यांच्या मनात हा विचार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हे सर्व वाचण्यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना पुढे आले आहेत .या माहितीचा गैरवापर होतो आहे. ही माहिती चोरून पुरवली जाते आहे अशा अवस्थेतले बालकांचे जगत या माहितीपासून दूर कसे ठेवायचे! हा प्रश्न अपवादात्मक थोड्याच पालकांना पडतो आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि हे होऊ द्यायचे नसेल तर नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे अवतीर्ण होऊन असलेले जग आणि त्या सुविधा हे तर फार मोठे संकट व उपाय योजना साठी उपयुक्त ही ठरणार आहे मात्र यांच्यातील बदल व निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे वासना ग्रस्त आभासी ओन लाईन सुवीधेला याला बळी गेलेले विद्यार्थी हे मानसिक रुग्ण बनत आहेत.

एकाउन्मादीअवस्थेत तासंतास राहत आहेत याचाशोध पालक घेत नाहीत या कंपन्यांच्या वर. या ऑनलाईन दृश्य माहितीबद्दल एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेशन या प्रकारची उपाययोजनेची गरज आहे .
एकूणच तंत्रज्ञान ही मानवी अस्थिरता निर्माण करते आहे भावनांची निरामयता नष्ट करते समाज जीवनाच्या अनुबंधाला उध्वस्त करते आहे नाती आणि नीती यांचे नाते तुटून जाणार आहे घडत असणाऱ्या भावना आणि समाज आवश्यक धारणा यांना नष्ट करणारे तंत्र ज्ञान ही एक सततची समस्या राहणार आहे या समस्येला सामोरे जाने सामूहिक गरज आहे ऑनलाइनच्या जगाचे लाभ आणि तोटे याचा विवेक कंपन्या बाळगत नाहीत म्हणून आगामी व वर्तमान मानव जातीच्या बालविश्वावर होणाऱ्या विपरीत परिणामाचा विचार करणे त्यावर उपाय करणे सामूहिक वर्तन करणे आणि सजगतेचे तंत्रज्ञान अनुकूल जग वापरासाठी तयार करणे ही मानवी तत्परता तयार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे संयुक्त राष्ट्र संघाने त्यात पुढाकार घेतला आहे त्यासाठी या सगळ्या अदृश्य जगाला गतिमान करणारे तंत्रज्ञान वीर कसे सहकार्य करतात? हाच खरा प्रश्न आहे

बालक ही आपली गोष्ट आहे बालक ही संस्कारीत गोष्ट आहे बालक ही भविष्याची खात्री आहे तो आनंद आणि मुक्तीदायी जीवनाचा आधार आहे. उद्याचे जग हे प्रश्नांचेच असते प्रश्न हे वास्तव असतात वास्तवाचा वर्तमान कालीन अर्थ लावणे आणि वर्तन करणे त्यावर उपाययोजने हे बुद्धीपुढील आव्हान आहे निव्वळ नफा हे उद्दिष्ट ठेवणाऱ्या या तंत्रज्ञान वीरांच्या कार्यावर नियंत्रण दबाव आणि हस्तक्षेप महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी नवे कायदे तयार करणारी व्यापक रणनीती आवश्यक आहे यातूनच बालकांचे भविष्य आणि त्यांचे शोषण हे सुरक्षित राहू शकते हे तंत्रज्ञान आहारी जाणाऱ्या प्रौढ जगताला कळेल तर !

वर्तमान वर्तमान हे प्रौढांचे असते वर्तमान हे समस्यांचे असते वर्तमान भविष्याचे वेध घेते त्या समस्या समजावून घेते आणि संकटांच्या निरसणासाठी प्रयत्नांची महती पटवून देते हे वर्तमानाचे प्रश्न वास्तव हे प्रत्येकाला प्रतीत व्हायला हवे प्रश्नांचे वास्तव ही गोष्ट सतत तयार होते पण वास्तवाचा सामूहिक विचार करणे हेही खूप महत्त्वाचे असते सामूहिक वास्तवावर स्वार होणे आणि समाजभान व समाज वर्तन नियंत्रित करणे ही यापुढच्या काळात तील सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी ठरणार आहे म्हणून प्रश्नांचा वास्तवावाद हा संकटाचा इशारा आहे मूल्य विचार जेव्हा सर्व बदलतात तेव्हा वास्तवाचे अंतरंग गुंतागुंतीचे बनतात वास्तवाचा स्वीकार ही शहाणपणाची गोष्ट आहे पण वास्तवाला सामोरे जाणे ही कृतीची गोष्ट ठरली पाहिजे जगभरच्या बाल विश्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणि ऑनलाइनच्या वासना युद्धाचे संकट आले आहे याला कसे सामूहिक सामोरे जायचे याबद्दल विचार होणे आवश्यक आहे मनुष्य ही एक स्थिर व स्वभान गोष्ट असते हे स्वभान व स्थिरता उध्वस्त करणारे जग होणार नाही याचे पूर्व प्रयत्न सुरू व्हायला हवेत हा आशीर्वाद बाल आनंद घेणाऱ्या जागतिक नागरिकांनी करायला हवा आणि आनंद आणि बाल यांचे निसर्ग नाते नित्य पुढे जायला हवे तरच मानवी सभ्यता आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधला जाईल असे म्हणता येते.

✒️शिवाजी राऊत(सातारा)मो:-9423032256