‘माँ की रोटी’ महिला बचत गटाचे खानावळचे शुभारंभ

318

✒️किशोर बावने(विशेष प्रतिनिधी)मो:-7350793187

साकोली(दि.15फेब्रुवारी):-ग्रामीण रुग्णालय साकोलीच्या मेन गेट समोर महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गट यांच्या सयुक्त विधेमानाने माँ की रोटी महिला बचत गट खानावळ सुरु करण्यात आले.त्या प्रसंगी कार्यक्रमचे अध्यक्ष श्री रविभाऊ परशुरामकर माजी नगरसेवक होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं की ग्रामीण भागातील,गरीब,अनाथ, आजारी, विधवा, अपंग,विद्यार्थी, व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी उद्धघाटन प्रमुख सौ. धनवंताताई
राऊत माजी नगराध्यक्षा , डॉ रुपेश बड़वाईक, अमितेश वडेटवार,फ्रीडम चे अध्यक्ष किशोर बावने, निलेश सिंह शिंगोर, सौ कुंदा मुंगुलमारे आदि मान्यावर उपस्थित होते.

महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुनीता टेकराम सोनटके, सचिव वनिता अशोक ब्राह्मणकर, सदस्य सौ जोती गंगाधर ब्राह्मणकर, सौ सुलोचना देवी लिलारे, सौ भावना प्रकाश चुन्ने, सौ सुनिता पुरस्तम ब्रामनकर, सौ माया विनोद मुगुलमारे, सौ गीता ताराचंद मेश्राम, सौ उर्मिला शालीकराम बोरकर, सौ राजश्री संजय कंपते, सौ सुनंदा शालीकराम कावले, सौ माधुरी भेंडारकर, सौ दिव्या रहांगडाले, सौ निर्मला तेजराम गहाने, सौ समिता हत्तीमारे उपस्थित होते.यावेळी प्रस्तावना संजय दिघोरे यांनी केले तर आभार सचिन पचारे यांनी केले.