कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळताच त्यांनी केली चक्क आनंदाने नाचायलाच सुरुवात

32

✒️कुशल रोहिरा(सातारा, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.2ऑगस्ट):- खळे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळताच त्यांनी चक्क आनंदाने नाचायलाच सुरुवात केल्याने तणावाने गुदमरलेला कक्ष क्षणातच आनंदी झाला. हा प्रकार तळमावले येथील कक्षात घडला.कोरोनाच्या तपासणीला स्वॅब घेतल्यापासून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत कोरोना बाधितांच्या निकट सहवासितांची धाकधूक वाढलेली असते. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद परीक्षेच्या निकालापेक्षा वेगळानसतो. तळमावले येथील कक्षात असाच आनंद ओसंडला.खळे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्या वेळी त्यांनी चक्क आनंदाने नाचायलाच सुरुवात केली. तणावाने गुदमरलेला कक्ष क्षणातच आनंदाने माखून गेला.दहा दिवसांपासून युवक क्वारंटाइन होते. घरी क्वारंटाइन न होता गावाबाहेरच्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत आणखी 14 दिवस थांबण्याचा निर्णय त्या सर्वानी घेतल्याचे सरपंच संदीप टोळे यांनी सांगितले. तळमावले येथील विलगीकरण कक्ष रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने रिकामा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यात दाखल असलेल्यांचा आकडा 79 वरून 15 वर पोचला. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या
त्यातील 11 जणांना त्यांच्या गावी खळे येथे पाठविण्यात येणार आहे.