छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य बालपणापासून मुलांवर रूजविणे गरजेचे-अॅड. भावना लाकडे

143

🔸समस्त सक्षमीकरण बहु. विकास संस्थेच्या वतीने शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.20फेब्रुवारी):-19/02/2024 रोजी समस्त सक्षमीकरण बहुउद्देशिय विकास संस्था द्वारे नवेगांव येथील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या एन्जाॅय लर्निंग वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकत्र्या अॅड. भावना लाकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची माहिती व महाराजांनी रयतेला स्वाभीमानाने जगण्याची संधी आपल्या राज्यामध्ये उपलब्ध करून दिली तसेच त्यांच्या हिताचे रक्षणही राजांनी केले असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्रय बालपणापासूनच आपल्या मुलांवर रूजविणे गरजेच आहे, एक पुत्र एक प्रशासक कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होत. शिवाजी महाराजांचे चारित्र्य बालमनावर रूजविल्यास भविष्यात मुल सुसंस्कारी होतील यात काही शंका नाही असेही त्या आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात म्हणाल्या.

यावेळी अभ्यासवर्गाचे प्रशिक्षक प्रविणा लाडवे व श्रेयस सयाम यांनीही उपस्थित बालकांना शिवाजी महाराजांच्या धाडसी पराक्रमाबद्दल व त्यांच्या प्रेरणेतून संकटात कशा प्रकारे योग्य मार्ग काढला जावू शकतो याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. या कार्यक्रमास बालकांची उत्स्फुर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रेयश सयाम यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्षा अॅड. भावना लाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविना लाडवे, सचिन खोब्रागडे, डिम्पल चुनारकर, हिरकना खोब्रागडे यांचे मोलाचे योगदान राहिले.