युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजात परिवर्तन घडवावे:श्रीहरी सातपुते (जिल्हा सहचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया)

79

🔸गोरवट येथे शिवजयंती उत्साहात

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची तीच संकल्पना आत्मसात करून समाजात परिवर्तन घडऊन आणावे असे प्रतीपादन श्रीहरी सातपुते (जिल्हा सहचिटणीस व्हॉईस ऑफ मीडिया) यांनी गोरवट येथील शिवजयंती निमीत्य केले.

जगदंबा ग्रुप गोरवटच्या वतीने हनुमान मंदिर प्रांगणात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र नन्नावरे होते, यावेळी श्रीहरी सातपुते,तानाजी सहारे, सरपंच मनोहर चौधरी, रोहन नन्नावरे, ह भ प मगरे महाराज, नरेंद्र दोडके, डॉ वणदेव दुधे, राजेंद्र नन्नावरे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सहचिटणीस श्रीहरी सातपुते यांनी शिवरायांची प्रेरणा मनात ठेवत युवकांनी एकत्रित येऊन शिवरायांच्या संकलपनेनुसार समाजात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयंत श्रीरामे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंबा ग्रुपचे अध्यक्ष जयंत श्रीरामे, सुशील नन्नावरे, डाकेश्वर नन्नावरे, रोशन नन्नावरे, सुशील श्रीरामे, मोहन श्रीरामे, विलास श्रीरामे, रोशन दडमल, देवेंद्र नन्नावरे,दयाराम वाकडे, डाकेशवर वाकडे यांनी अथक परिश्रम घेतले.