शेंदुर्जनाघाट शहरातील विविध विकासकामांसाठी ४९ कोटी ४४ लक्ष रुपये मंजूर !

78

🔸आमदार देवेंद्र भुयार पाठपुराव्यामुळे विवीध विकास कामांना मंजुरी !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.21फेब्रुवारी):-शेंदुर्जनाघाट शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत शहरातील रस्ते विकास करण्यासाठी ४९ कोटी ४४ लाख कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, शहरातील रस्त्यांचा कामांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्ण केला आहे.

शेंदुर्जनाघाट शहराच्या विकासाकरिता या आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून शेंदुर्जनाघाट शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम नगर परिषदेने पूर्ण केले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेंदूरजनाघाट शहरातील प्रत्येक रस्ता व पुलांची कामे दर्जेदार व्हावे, केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकासात्मक कायापालट करणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.

शेंदुर्जनाघाट शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये अनिल अंतुरकर यांच्या घरापासुन ते श्री. प्रकाश बिजवे यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी १५ लाख ८८ हजर ११५ रुपये. प्रभाग क्र. ३ मध्ये पुसला रिंग रोड ते न.प. हद्दीतील (पंप हाऊस रोड) पर्यंतरस्त्याची सुधारणा करणे २ कोटी २५ लाख ५३ हजर रुपये. प्रभाग क्र. ३ मध्ये गफ्फार चौक ते रिंग रोड ते न.प. हद्दीपर्यंत (वाई रोड) पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपये. प्रभाग क्र. ६ मध्ये श्री. भाऊराव गोरडे यांच्या घरापासुन ते मुस्लीम कब्रस्थान पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ३३ लाख ३४ हजार रुपये. प्रभाग क्र. ६ मध्ये मुख्य तिवसा रोड पासून ते बागाचा रोड पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी १२ लाख २२ हजार रुपये, प्रभाग क्र. ८ मध्ये श्री. अण्णा चाफले यांच्या घरापासुन ते श्री. सुरेश बेलसरे यांच्या कोठ्यापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ९७ लाख ३१ हजार रुपये. प्रभाग क्र. ८ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ते मच्छीसाथ ते पुसला रिंग रोड पर्यंत लहान पुलाचे बांधकामासह रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपये. प्रभाग क्र. ८ मध्ये पशुवैद्यकीय इमारती पासून ते हिंदू स्मशानभुमी ते वरुड रोड पर्यंत लहान पुलाचे बांधकामासह रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी १७ लाख ९५ हजार रुपये. प्रभाग क्र.१ पुसला रिंग रोड ते कुबडेखारी ते जिवना नदीपर्यंत लहान पुलाचे बांधकामासह रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ४० लाख रुपये. प्रभाग क्र. ८ मध्ये किशोर बेलसरे कोठा ते दलित स्मशानभुमी ते आड नदी पर्यंत लहान पुलाचे बांधकामासह रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपये. प्रभाग क्र. ६ मध्ये बाला सुंदरी मंदिर ते शे.घाट न.प. हद्दीपर्यंत (वरुड रोड) रस्त्याची सुधारणा करणे ६ कोटी ३२ लाख ८० हजार रुपये. प्रभाग क्र. २ मध्ये पुसला रिंग रोड ते नागोबा मंदिर पर्यंत (सातनुर रोड) रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ३९ लाख ४४ हजार रुपये. प्रभाग क्र. १ मध्ये श्री. मोतीरामजी डुकरे यांच्या घरापासून ते रवाळा रोड पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे ८२ लाख ७७ हजार रुपये. या सर्व विकास कामांकरिता शेंदुर्जनाघाट शहरातील या सर्व विकास कामासाठी ४९ कोटी ४४ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या सर्व विकासकामांना सुरुवात होणार आहे.

शेंदुर्जनाघाट शहरात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष पुढाकाराने कोट्यावधी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नगरोत्थान महा अभियान अंतर्गत शहरातील उर्वरित महत्वाच्या कामांसाठी ४९ कोटी ४४ लाख रुपयांच्या विकास कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली, असून या बाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट यानिमित्ताने होणार असून, ही कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असून उर्वरित विकासकामांसाठी विविध योजनांचा माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे असे म्हणत आमदार देवेंद्र भुयार यांनी शेंदुर्जनाघाट शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

शेंदुर्जनाघाट शहरातील रस्ते पुलासह विविध समस्यांची परिस्थिती लक्षात घेता शहरातील विविध विकासकामांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत ४९ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच शेंदुर्जनाघाट शहरातील विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे —— आमदार देवेंद्र भुयार