जयपूर फूट व कृत्रिम हात वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन

73

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21फेब्रुवारी):-सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नावी दिल्ली, जिल्हा प्रशासन परभणी, सत्यम दिव्यांग मंच परभणी, एस.आर. ट्रस्ट रतलाम (मध्य प्रदेश) यांच्या वतीने आणि गंगाखेड चे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अस्थिव्यंग दिव्यांगा करीता केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यात केवळ अस्थिव्यंग दिव्यांगाना मोफत आत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कृत्रिम हात पाय (जयपूर फूट), पोलिओग्रस्तांसाठी क्यूलिफर ए. एफ.ओ. कमरेपासून दोन्ही पायांना पोलिओ झालेल्यांना एच.के.एफ.ओ. व पायांच्या घोट्यापासून पाय नसणाऱ्यांना सर्जिकल शूज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पंझा इत्यादी साहित्य वाटपासाठी तपासणी करून जागेवरच आवश्यक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येत आहे.

अस्थिव्यंग तपासणी शिबिर काल दि. २० फेब्रुवारी रोजी आ.गुट्टे यांचे रामसीता सदन जनसंपर्क कार्यालय गंगाखेड येथे, दि. २१ फेब्रुवारी रोजी जनसंपर्क कार्यालय पालम येथे तर २२ फेब्रुवारी रोजी जनसंपर्क कार्यालय पूर्णा येथे सकाळी १० ते सायंकाळी ०४ या वेळेत आयोजित करण्यात आले.

यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड तालुक्यातील १३१ व पालम तालुक्यातील ८३ अस्थिव्यंग लाभार्थ्यांनी आवश्यक कागपत्रांसह तपासणी करून घेत या शिबिराचा लाभ घेतला. यात त्यांना आवश्यक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले आहे.

गंगाखेड व पालम तालुक्यातील अस्थिव्यंग लाभार्थ्यां आपल्या तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या तपासणी शिबिरात सहभागी होऊ शकले नाहीत अशा लाभार्थ्यांनी दि.२२ फेब्रुवारी पूर्णा येथे होणाऱ्या तपासणी शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.