सुगंधित तंबाखूसह 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

304

🔺स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.२४ फेब्रुवारी):-मराठवाड्यातील हिमायतनगर येथून पुसद कडे जाणाऱ्या बोलेरो पिकप वाहना मधून सुगंधित तंबाखू ची वाहतूक बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच ८१२० ने होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या सीताफिने सापळा रचून दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान उमरखेड ढाणकी रस्त्यावरील गावंडे कॉलेज जवळ सुगंधी तंबाखू किंमत अंदाजे १४ लाख रुपये व बोलेरो पिकप वाहन किंमत अंदाजे नऊ लाख असा एकूण २३ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी युनूस खान कासार खान राहणार हिमायतनगर वय २९वर्षे विक्रम शंकर कराळे वय २३ वर्षे राहणार पुसद सय्यद अमीर सय्यद खमर वय ४५ वर्षे राहणार हिमायतनगर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ही कारवाई पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, psi रेवण जागृत, कुणाल फंडोकार, सुभाष जाधव, तेजाब रणखांब, रमेश राठोड, ताज मोहम्मद,सुनिल पंडागळे यांनी पार पाडली असून या कारवाईमुळे अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू माफिया चे धाबे धाबे दणाणल्याचे या कारवाई वरून दिसून येत आहे.