संत रविदास मानवतेचे पुजारी होते : जयसिंग वाघ

46

✒️भुसावळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भुसावळ(दि.24फेब्रुवारी):- भारतात १२ व्या शतका पासून संत परंपरा निर्माण झाली त्या परंपरेतिल १४ व्या शतकात जन्माला आलेले संत रविदास हे प्रखर मानवतावादी होते , स्त्री – पुरूष विषमता न मानता त्यांनी महिलांना सुद्धा भक्तिमार्गात आणून त्यांना मानसन्मान मिळवून दिला , त्यांच्या मुळेच शुद्र – अतिशुद्र वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तित लीन होत गेला , रविदास पंथ निर्माण झाला त्यातून रविदास केवळ एका जातीचे न रहता सर्वच जाती धर्माचे आदर्श झाले असे विचार प्रसिद्ध साहीत्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी दीपनगर येथे आयोजित संत रविदास जयंती निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले .

जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , संत रविदास यांना ११२ ते १५० वर्षाचे आयुष्य लाभले , बाल वयापासून ते ईश्वरभक्ति करत होते , प्रबोधनपर काव्य करीत होते असे असताना त्यांचे नावे १८० पदे व २३० दोहे एवढे अल्प साहित्य शिल्लक राहिले याचा अर्थ त्यांचे मुळ साहित्य एकतर कोणीतरी चोरले वा ते नष्ट केले गेले . संत रविदास यांचे एवढ्या अल्प साहित्यातून एवढी सामाजिक , धार्मिक क्रांति होवू शकते तर पूर्ण साहित्यातून काय काय बदल झाले असते याची आपण कल्पना करु शकतो . संत रविदास यांना राजदरबारी राजाच्या बरोबरीची वागणूक दिली जात होती तेंव्हा राजकीय क्रांति सुद्धा घडू शकते एवढी ताकत त्यांच्यात आहे हे आपण समजून घ्यावे आज प्रत्येक संत , महापुरुष आपापल्या जातित आपणच वाटून टाकले व आपणच त्यांचे महत्व कमी कमी करु लागलो ही एक प्रकारे आपली लाजीरवाणी बाब आहे असे स्पष्ट मत वाघ यांनी विषद करुन बुद्ध , अशोक , कबीर , रविदास , फुले , शाहू , बाबासाहेब ही परंपरा आपण चालवावी असे आवाहनही जयसिंग वाघ यांनी केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप मुख्यअभियंता संतोष वकारे होते , त्यांनी आपल्या भाषणात संत रविदास यांचा सामाजिक व आध्यात्मिक लढा आजच्या पीढीला मार्गदर्शक आहे , ते समतेचे कैवारी असून आज समता प्रस्थापित करण्या करीता आपण कटिबद्ध होने आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले .

सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेन्द्र बावस्कर यांनी रविदास यांच्या विविध दोह्यांचे दाखले देवून ते आदर्श समाजव्यवस्थेचे निर्माते होते , संत रविदास यांनी आपले १५० वर्षे जनप्रबोधना करीता खर्ची घातले , त्यांचा रविदास पंथ आजही मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले .

प्रास्ताविकपर भाषणात डॉ. संजू भटकर यांनी आपण आपले आदर्श , महापुरुष जातिजातित विभागुन टाकले ही मोठी शोकांतिका आहे , संत रविदास यांनी जाती , धर्म यांच्या भिंति तोडून टाकल्या आहेत व हाच आजचा खरा आदर्श आहे असे सांगितले .आमदार संजय सावकारे यांनी सभास्थळी भेट देवून संत रविदास यांच्या प्रतिमेस वंदन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास घोपे तर आभारप्रदर्शन मोहित कांबळे यांनी केले .

कार्यक्रमास अशोक भगत , रविंद्र सोनकुसरे , मुकेश मेश्राम , चेतन आंबटकर , संजय हिरवे , किशोर शिरभैया , मनीष बेडेकर , राजेश निकम , डॉ. प्रशांत वाघ , इतर अधिकारी तसेच श्रोते मोठ्यासंखेने हजर होते .कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रशांत वाघ , रोशन वाघ , रामेश्वर तायड़े , विक्रम अहिरे , गोपाल चिम , चिंतामण सोनवणे , राजेश ढोके यांनी विशेष परिश्रम घेतले .सुरवातीस संत रविदास यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या .