छत्रपती उदयनराजेंच्या शिलेदारांची चौदा वर्ष रक्तदान शिबिरातून तपश्चर्या….

101

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्री. छ .खा. उदयनराजे भोसले हे माणुसकीचे लहू चुंबकीय आहेत. त्यांच्या विचारानुसार अनेक शिलेदार व मावळे छातीचा कोट करून आदेश मानतात. सातारा शहरातील माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव हे गेली चौदा वर्ष श्री. छ. खा.भोसले (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे. गेली चौदा वर्षे तपश्चर्या समजून ते रक्तदान शिबिर आयोजित करीत आहेत .

सातारा शहरातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट व श्री शाहू मंडळ तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीने सातारचे माजी नगराध्यक्ष कैवारी आप्पासाहेब आहेरराव सांस्कृतिक हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित केले.

दरवर्षी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत असून देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंच्याहत्तरी साजरी झाली आहे. त्याचबरोबर या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी शतक साजरे केले. सध्या सातारा जिल्ह्यात अनेक रक्तदान शिबीर होतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजवंतांना रक्ताचा पुरवठा होतो. वास्तविक रक्तदानामुळे सर्वधर्मसमभाव व मानवतेची शिदोरी घट्ट होत आहे.

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी माणुसकीची शिकवण देऊन सर्व जाती धर्मातील लोकांना सहकार्य करण्याची आतापर्यंत भूमिका घेतलेली आहे. सातारचे कंदी पेढे व राजांचा दिलदार स्वभाव… या दोन गोष्टी सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आहे.

सातारा शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी व बॅनरबाजी झाली असून यामधून काहींनी स्वतःचीच छबी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, खऱ्या अर्थाने लोकांना मदत केल्यानंतरच लोक निवडणुकीच्या काळात या गोष्टीची जाणीव ठेवून मतदान करतात. त्या अर्थाने माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या प्रयत्नाने झालेल्या रक्तदान शिबिरातून खऱ्या अर्थाने सर्व जातीतील लोकांशी नाळ जोडले गेलेली आहे. शेवटी समाजकारण हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराचा फायदा अनेकांना झाल्याची माहिती गरजवंतांनी दिलेली आहे.

माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. कोरोना काळातही त्यांनी केलेली मदत तसेच गेले अनेक वर्ष सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवून त्यांनी आपल्या स्वकर्तबगारीवर नावलौकिक प्राप्त केलेले आहे. त्यांच्या या विधायक उपक्रमाबद्दल श्री. छ. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कौतुक केले आहे. आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा केल्या असल्याचे मनोगत व्यक्त करून आभार मानले आहेत.