मोर्शी वरूड तालुक्यात पुन्हा ३०० किलोमिटर पांदण रस्त्यांना मान्यता !

387

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने हजारो पांदन रस्त्याच्या कामांना सुरुवात !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.25फेब्रुवारी):-वरूड विधानसभा मतदारसंघात गेल्या केवळ चार वर्षांत एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे केवळ पाणंद रस्ते मंजूर झाले असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. एखाद्या मतदारसंघात इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या लांबीचे रस्ते तयार होणे, हे कदाचित राज्यातील पहिलेच उदाहरण असावे.

कागदावर रस्ते आणि रस्त्यात अतिक्रमण आणि झुडपे अशी परिस्थिती असताना यात बदल करण्याच्या हेतूने आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. रस्त्यांसोबतच पाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन, असे इतरही अनेक प्रश्न या मतदारसंघात असल्याने त्यावर काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. लोकांच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करताना आ. देवेंद्र भुयार यांनी विविध विकासकामांचा झपाटा सुरू केला. आजवर केवळ निवडणुकीत मते मिळण्यासाठी दिली जाणारी आश्वासने आ. देवेंद्र भुयार यांनी प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून पूर्ण करत असल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून मोर्शी वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत,पांदन रस्ते योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मोर्शी वरूड तालुक्यातील ३०० पांदण रस्त्याच्या कामांच्या आराखड्यास दि २२ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढून मान्यता मिळाली आहे.

शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास तारेवरची कसरत करावी लागत होती त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांना पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करणार असल्याचे निवडणूक काळात दिलेले आश्वासन आमदार आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्ण करून मोर्शी वरूड तालुक्यात हजारो पांदन रस्ते मंजूर करून पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येत आहे.

यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दृष्टिकोनातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात आले आहे. आता पुन्हा मोर्शी वरूड तालुक्यात ३०० पांदण रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली असून बाकी पांदण रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण केली जातील असे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.