खडसंगी येथील इलेक्ट्रिक डीपी जळून खाक – घटनास्थळी तत्काळ मदतीमुळे दुर्घटना टळली

222

✒️शार्दुल पचारे(प्रतिनिधी चिमूर)

चिमूर(दि.6मार्च):-येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडसंगी येथे इलेक्ट्रिक डीपी जळून खाक झाल्याची घटना घटली असून पत्रकार प्रमोद राऊत यांच्या सतर्कते मुळे मोठी दुर्घटना टळली
खडसंगी येथील बेघर वस्तीत ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर दूधडेअरी होती. या परीसरात बेघर वस्तीत विद्युत पुरवठा करण्यासाठी एमईसीबी ची डिपी लावलेली होती. या डीपी मधून अचानक मोठा आवाज झाला अन् आग लागली.

आवाज होताच जवळपासच्या नागरीकांनी दूध डेअरीकडे धाव घेतली असता खाली असलेला पालापाचोळा जळण्यास सुरवात झाली व धूर निघायला लागला यावेळी बेघर वस्ती येथील रहिवासी असलेले श्रावण नागोसे यांनी पत्रकार तथा माजी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद राऊत यांना घटनेची माहिती दिली.

प्रमोद राऊत यांनी घटनस्थळाला भेट देऊन पाहणी केली व भाजपाचे महामंत्री रोशन बनसोड यांना माहिती दिली असता तात्काळ केसीसी कंपनीला संदेश देऊन पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवला त्यामुळं समोरील मोठा अनर्थ टळला. यावेळी गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून नागरिकांनी व रोशन बनसोड, प्रमोद राऊत यांचे आभार मानले.