अवैध रेती वाहतूक करणारे दोन वाहन पोलिसांच्या ताब्यात

    155

    ?दोन लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त;स्थानिक पोलिसांची कारवाई

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

    उमरखेड(दि.6मार्च):-नदी नाल्यातील अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करत असताना दोन टिप्पर पोलिसांनी पकडले यामध्ये दोन ब्रास रेती व वाहन मिळून दोन लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन वाहन चालकावर गुन्हा नोंद केल्याची घटना दि. ४ मार्च रोजी पहाटे तीन वाजता चे दरम्यान घडली.सदर कारवाही उमरखेड पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने पार पाडली.

    याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड पोलीस डीबी पथक प्रमुख अनिल सावळे, अंमलदार अंकुश दरबस्तवार व चालक मिरासे रात्री गस्त करत असताना रात्री दोन वाजता ढाणकी रोडवरील उडान पुला जवळून अवैध रेती वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून उडान पुलाजवळ पथक थांबले असता टिप्पर क्रमांक एम एच १२ यु ए५८१ हे एक ब्रास अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले .

    यानंतर रात्री तीन वाजता नांदेड रोड वरील दिघेवार पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावर टिप्पर क्र एम एच २६ एच ८२४९ हे एक ब्रास रेती अवैध वाहतूक करताना आढळल्याने त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी टिप्पर चालक सय्यद इमरान सय्यद मकदम रा. राजेंद्र प्रसाद वार्ड उमरखेड व चालक शेख जबीर शेख सलीम भगतसिंग वार्ड उमरखेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोन लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

    चौकट –
    कार्यवाही पहाटे तीन वाजता पण गुन्हा नोंद रात्री आठ वाजता

    उमरखेड च्या डी बी पथकाने रात्री गस्तीदरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई केली परंतु गुन्हा मात्र रात्री आठ वाजता च्या दरम्यान दाखल करण्यात आला त्यामुळे प्रकरणादरम्यान वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जात होते

    चौकट – चालकांवर गुन्हा नोंद मालकावर कधी ?

    अवैध रेती वाहतूक प्रकरणात
    पोलिसांनी दोन्ही वाहनाच्या चालकावर गुन्हा नोंद केला मात्र गुन्हा नोंद करत असताना मालकांवर अद्याप गुन्हा नोंद न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात होते.