एन. सी. सी. कॅडेटचा निरोप समारंभ संपन्न

113

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील एन सी सी गर्ल्स युनिट च्या वतीने तिसऱ्या वर्षाच्या एन सी सी कॅडेट ला निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे आधार स्तंभ अध्यक्ष मारोतराव कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक उप पोलिस निरीक्षक राजकिरण मडावी तर प्रमुख उपस्थितीत प्रशांत डांगे पत्रकार तसेच प्रा.लेप्ट.सरोज शिंगाडे उपस्थित होते .सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. एन सी सी गर्ल्स युनिट च्या वतीने वर्ष भर राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व स्पर्धेत भाग घेणाऱ्या आणि प्रावीण्य प्राप्त कॅडेटना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तिसऱ्या वर्षाच्या गर्ल्स कॅडेट जागृती,स्निग्धा यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.लेप्ट.सरोज शिंगाडे यांनी केले.तर प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक उप पोलिस निरीक्षक राजकिरण मडावी यांनी विद्यार्थिनींना पोलिस भरती तसेच अन्य स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शक केले.तसेच परिस्थितीचे रडगाणे न सांगता जिद्दीने आणि कठोर परिश्रम करून आपले ध्येय साध्य करावे असे विचार प्रकट केले तर प्रशांत डांगे पत्रकार यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव कांबळे यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन एन सी सी गर्ल्स युनिट प्रथम वर्षाची कॅडेट तनुश्री बुल्ले तर उपस्थितांचे आभार एन सी सी गर्ल्स युनिट प्रथम वर्षाची कॅडेट हिना मसराम हिने मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन सी सी गर्ल्स युनिट सर्व कॅडेट ने अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन सी सी गर्ल्स युनिटच्या सर्व कॅडेट ने अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास एन सी सी गर्ल्स युनिट च्या सर्व कॅडेट तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.