निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी घेतला गंगाखेड मतदार संघाचा आढावा.

135

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा सावत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि 30 मार्च रोजी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी च्या नियोजना करिता मा.भारत निवडणूक आयोग यांचे मार्फत नियुक्त मा. श्री.अनुराग चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय गंगाखेड येथे नियोजन बैठक पार पडली.लोकसभा सावत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी बाबत भरारी पथक, स्थिरचित्रीकरण पथक,बैठे पथक, चित्रीकरण तपासणी पथक,सह निवडणूक खर्च पथक व सनियंत्रण पथक यांची नियुक्ती करण्यात आली.सदरील बैठकीमध्ये सर्व पथकांना निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने कामकाजा बाबत आवश्यक सूचना देऊन आढावा घेण्यात आला मोजे चुडावा, झिरो फाटा पेटशिवनी व बनवस येथे स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्टलाही भेट देऊन सदर पथकाचे कामकाजा बाबत मा. निरीक्षक महोदयांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मा.निरीक्षक महोदय यांच्या सोबत त्यांचे संपर्क अधिकारी श्री.सचिन कवठे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज दापकर,गंगाखेड तहसीलदार प्रदीप शेलार,पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर,पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे, सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.