उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार न घेण्यावरून युवकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (साखरा येथील मारहाण प्रकरण परस्पर विरोधी तक्रारीवरून ॲट्रॉसिटी गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल)

176

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 6 एप्रिल) येथील पोलीस ठाण्यात तालुक्यातील साखरा येथे काल घडलेल्या मारहानी घटनेची तक्रार देण्याकरता आलेल्या युवकाची तक्रार आज दुपारपर्यंत न घेतल्यामुळे सदर युवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी विष प्राशन केल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून बारा जनावर गुन्हे दाखल केले आहे.

तालुक्यातील साखरा येथे काल सायंकाळी अंबादास तुकाराम मुनेश्वर (33) हा बाजूच्या गावावरून हमालीचे काम करून आला असता हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेला होता.

त्यावेळी हॉटेल मालक नामदेव नारायण वानखेडे यांनी जातीवर शिवीगाळ करून मारहाण केली यावरून वाद झाला व नामदेव नारायण वानखेडे (50) स्वप्नील काशिनाथ वानखेडे (25) नामदेव वानखेडे यांची तीन मुले , छाया नामदेव वानखेडे, संतोष सूर्यवंशी यांचे दोन मुले अशा आठ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची तक्रार अंबादास तुकाराम मुनेश्वर हे उमरखेड पोलीस स्टेशनला करण्यासाठी काल सायंकाळपासून आले असता रात्री अडीच वाजेपर्यंत त्यांची तक्रार घेण्यात आली नाही व आज सकाळी दहा वाजता त्यांना परत पोलिसांनी बोलावले त्यावरून सकाळी दहा वाजता उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांची तक्रार दुपारपर्यंत घेण्यात येत नव्हती. त्यामुळे तक्रार करता अंबादास मुनेश्वर यांनी कंटाळून विष प्राशन केले.

आवारातच विष प्राशन केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली व त्याला त्वरित येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर केले आहे.

त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.

दरम्यान याच घटनेतील नामदेव नारायण वानखेडे हॉटेल मालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबादास तुकाराम मुनेश्वर , देविदास तुकाराम मुनेश्वर , हरिदास तुकाराम मुनेश्वर , येसुदास तुकाराम मुनेश्वर
या चार जणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार नामदेव यांनी माझी पत्नी ही शेतातून हळद काढून येत असताना अंबादास मुनेश्वर यांनी मागून येऊन खेटून गेला तेव्हा मी बोललो असता मला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व माझ्या हॉटेल वर जाऊन माझ्या मुलासोबत भानगडी सुरू करीत या सर्व आरोपींनी हातात चाकू घेऊन काठी घेऊन मारहाण केली व खिशातील सतरा हजार रुपये हे हिसकावले अशी तक्रार दिल्यावरून परस्परविरोधी तक्रारी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
……. ……..
दि.4 एप्रिल सायंकाळची घटना असताना देखील आम्ही त्वरित उमरखेड पोलीस ठाण्यात आलो असता आम्हाला रात्री अडीच वाजेपर्यंत उमरखेड पोलिसांनी थांबविले व नंतर तुम्ही सकाळी दहा वाजता या त्यानंतर तक्रार घेऊ असे सांगितले मात्र सकाळी दहा वाजता आल्यानंतरही तक्रार घेण्यास नकार देऊन माझ्याच मुलाला मधात टाकण्याची धमकी देत असल्यामुळे माझ्या मुलाने पोलीस ठाण्याचे आवारातच विष प्रशन करण्याचा प्रयत्न केला ही घटना केवळ पोलिसांमुळे घडली असून पोलिसांनी वेळेवरच तक्रार घेतली असती तर माझा मुलगा आज मृत्यूची झुंज देत नसला असता अशी प्रतिक्रिया यावेळी विषप्राशन करणाऱ्याच्या वडिल तुकाराम गंगाराम मुनेश्वर यांनी दिली.