पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रमाचे आयोजन:दि.07 ते 13 एप्रिल:- विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

102

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन दिनांक ७ एप्रिल ते 13. एप्रिल २०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद येथे करण्यात आले आहे.
यानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्म क्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन दिनांक ७एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मा. इंद्रनील नाईक आमदार पुसद यांच्या हस्ते व आमदार निलय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत मा. उत्तम कांबळे नाशिक यांचे बीज भाषण
जागतिकीकरण आणि वंचित समाजाचे प्रश्न या विषयावर बीज भाषण होणार आहे
स्थळ छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद

दि.०८ एप्रिल रोजी बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम लोकप्रिय युवा नेते मा. ययातीभाऊ नाईक ( माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
प्रसिद्ध गायक मा. संतोष जोंधळे नाशिक युवा महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार व संच यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे. स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर पुसद येथे होणार आहे.

दि.९ एप्रिल रोजी बुद्ध भीम गीत सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे पुणे यांच्या गायनाचा कार्यक्रम मा मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित करण्यात आला आहे.

दि १० एप्रिल २०२४ रोजी माननीय डॉ. वजाहत मिर्झा विधानपरिषद आमदार महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथील माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे खाजगीकरणाचा आरक्षणावर होणारा परिणाम या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे.
दि.११एप्रिल २०२४ रोजी माननीय डॉ. मोहम्मद नदीम यांच्या अध्यक्षतेखाली माननीय नितीन सावंत( धम्मक्रांती) परभणी यांचे जाहीर व्याख्यान विषय सत्यशोधक तत्वा कडून बुद्धतत्त्वाकडे या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि.१२एप्रिल २०२४ रोजी मा. प्रशांत वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील पुणे येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ मा. नवनाथ गायकवाड यांचे भगवान बुद्धाचा धम्म मनोविज्ञानावर कसा आधारित आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि. .१३ एप्रिल २०२४ रोजी माधवराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली भव्य बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम प्रसिद्ध गायक
प्रकाशदीप वानखेडे स्नेहल वानखेडे व साक्षी वानखेडे ( अमरावती) यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे.

दि. १४ एप्रिल २०२४ रोजी महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सकाळी ७ वाजता पंचशील ध्वजारोहण सामूहिक बुद्ध वंदना सकाळी ९ वाजता मोटरसायकल रॅली दुपारी ४ वाजता भव्य अभिवादन रॅली
समता सैनिक दलाची मानवंदना समारोप रात्री १० वाजता सामूहिक बुध्द वंदना होणार आहे .

या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन भगत यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे पुसदकरांना या निमित्ताने प्रबोधनाची मेजवानी मिळणार आहे. या सात दिवशीय धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
अध्यक्ष अर्जुन भगत, कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे, सचिव शरद ढेंबरे, उपाध्यक्ष बाबाराव उबाळे, ल.पु.कांबळे, विजय निखाते, सहसचिव आर. पी. गवई, प्रफुल भालेराव, कोषाध्यक्ष राहुल पाईकराव ,निर्भय गायकवाड, कार्यालयीन सचिव संजय वाढवे, प्रीतम आळणे,उत्तम कांबळे,संघटक विजय पाटील, प्रमोद धुळे, गोदाजी जमदाडे, सहसंघटक मधुकर सोनुने, हेमंत इंगोले, सनी पाईकराव, अर्जुन केळकर ,राजू कांबळे, अंबादास कांबळे, आनंद खडसे, अक्की पाईकराव ,सांस्कृतिक नियोजन प्रमुख सुभाष गायकवाड,बाळासाहेब कांबळे, संदीप कावळे, रॅली प्रमुख भारत कांबळे ,सुरेश कांबळे यांनी केले आहे.