चालक – वाहककडून वृध्द प्रवाशांना अपशब्दांची वागणुक मरखट मध्ये जायची तर बस मध्ये फिरते -कंडक्टर चक्क चालक बस रस्त्यावर सोडून ओळखीच्या घरी जावून बोलत बसतो

491

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986
भंडारा:- बस मध्ये प्रवास करणे म्हणजे सुरक्षित प्रवास समजला जातो. परंतु अलीकडे प्रवाशाबद्दल वेगळे चित्र बघायला मिळत आहे. कंडक्टर वृध्द प्रवाशांना मरखट (स्मशानभूमी)मध्ये जायची तर बस मध्ये फिरते असे अपशब्द बोलून प्रवाशांची खिल्ली उडवत असतात. तर चक्क चालक बस रस्त्यावर सोडून भर रस्त्यात प्रवाशांना उष्णते मध्ये गुदमळत सोडून ओळखीच्या घरी जावून बोलत बसतो आणि प्रवाशांना मरणाच्या दारावर सोडतो. हा जीवघेण्या प्रवास केव्हा मृत्युला जवळ घेईल असे नाकारता येत नाही. जसे की बस चालक – वाहक प्रवाशांना आपल्या खिशातून खर्च करतात अशी वागणूक प्रवाशासोबत बघायला मिळते.
दि.6 एप्रिल ला भंडारा डेपो मधून जवळपास 3 वाजता MH06.S.8278 नंबर ची बस सुटते तेव्हा पासूनच पवनी च्या डेपो पर्यंत पोहचत पर्यंत चालक – वाहक यांचा अपशब्दाचा वापर सुरूच असतो. प्राप्त माहिती नुसार चालकाचे नाव गावंडे असून संबधित अधिकारी अशा चालक वाहकावर कारवाही करतील का? असा प्रश्न वृध्द सुसज्जन व्यक्तींना नेहमीच भेडसावत असते.

______________________

प्रवास करताना नेहमीच वाहकाकडून गैरवर्तणूकीचे प्रकार बघायला मिळते परंतु यांच्यावर देखरेख टीम असणे गरजेचे आहे. जे की मध्ये मध्ये तपास करून प्रवाश्यांना त्रास होतो काय यावर नियत्रंण ठेवतील. जेणेकरून प्रवाशांचा बस प्रवास हा सुखकारक आहे. हे विश्वास प्रवाशांच्या मनात कायम राहील. – (बस प्रवाशी )