भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

  109

   

  ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी येथील लक्ष्मी कम्प्युटर येथे पार पडला या कार्यक्रमाला भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुंबई माननीय श्री राहुलजी गंगावणे साहेब, जळगाव जिल्हा सचिव गजानन कैथवास, विदर्भ अध्यक्ष राजेश खंदारे, जिल्हाध्यक्ष विजय कदम, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप मुनेश्वर हे उपस्थित होते.

  सर्वप्रथम राहुलजी गंगावणे सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर गजानन कैथवास, विजय कदम, दिलीप मुनेश्वर, राजेश खंदारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त भारत ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या माध्यमातून खूप मोठा ऐतिहासिक संकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडून संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुलजी गंगावणे साहेब यांनी व्यक्त केला.

  यावेळी उमरखेड,महागाव, दिग्रस तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख पदी लक्ष्मण भाऊ टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

  उमरखेड तालुकाध्यक्षपदी प्रभू पाटील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

  उपाध्यक्षपदी शेख बबलू, सचिवपदी राजेश कदम, कोषाध्यक्षपदी विजय वानखेडे, सहसचिव पदी दत्तराव मुधोळ, सह कोषाध्यक्षपदी गजानन जाधव, संपर्कप्रमुख पदी राजेश्याम गवळी, कार्याध्यक्षपदी मुजीब लाला यांची मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले.

  महागाव तालुका अध्यक्षपदी तुकाराम उमरे, उपाध्यक्षपदी रवींद्र राठोड, सचिव पदी अरविंद पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर दिग्रस तालुका अध्यक्षपदी संजय राऊत, उपाध्यक्षपदी जय राठोड, कोषाध्यक्षपदी किशोर जाधव, सचिव पदी पुरुषोत्तम कुडवे यांची नियुक्ती करण्यात आली.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय कदम यांनी केले.