इन्फिनिटी वाचनालय व लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे आगळ्या वेगळ्या चर्चा सत्राचे आयोजन

132

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी येथे इन्फिनिटी वाचनालय व लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक वेगळ्या प्रकारच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चा सत्राचे प्रमुख मार्गदर्शक लॉयन प्रा विष्णू मुरकुटे होते.
या चर्चा सत्रात एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी व त्यामुळे येणारे नैराश्य या विषयावर चर्चा झाली. चर्चेत सहभागी होत, अमेरिकेहुन या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राधेश्याम सारडा, यांनी विद्यार्थ्यांना झुम मिंटीग च्या माध्यमातून मार्गदर्शन केले व त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
या चर्चा सत्रात इन्फिनिटी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपकुमार सारडा, लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे सचिव लॉ भगत सुरवसे उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लॉ उमेश पापडु, लॉ महेंद्र वरवडे, संतोष नरवाडे यांनी मेहनत घेतली.