नोव्हेंबर २००५ पुर्वीच्या जाहिरातनुसार सेवेत रुजू शिक्षकांना जुनी पेंशन लागूचा आदेश निर्गमीत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती च्या पाठपुराव्यास यश

    167

     

    रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

    चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासुन शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांना एनपीएस योजना लागू केली पण ज्या कर्मचा-यांची पदभरतीची जाहिरात १ नोव्हेंबर २००५ पुर्वीची आहे मात्र सेवेत रुजू दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून आहे अशा शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.परंतू जिल्हा परिषद ने आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या अशा शिक्षकांची विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रे मागितले नसल्याने संभ्रम निर्माण झालेला होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांनी या संबंधी माहिती संकलीत करण्यासाठी पत्र काढले होते पण जिल्हा परिषद चंद्रपूर ने पत्र निर्गमीत न केल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता त्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती ने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन दिले व वारंवार भेटी घेऊन पाठपुरावा केला आणि इतर जिल्हा परिषद ने जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांची माहिती संकलीत करीत आहेत मग आपली जिल्हा परिषद मागे कां अशी प्रशासनाला वारंवार विचारणा करण्यात आली आणि यासंबधीचे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमीत केले. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्याचे पत्र निर्गमीत करण्यासाठी संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर राज्य सरचिटणीस हरीश ससनकर राज्याध्यक्षा पुरोगामी महिला मंच अल्का ठाकरे,जिल्हा नेते नारायण कांबले,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे दिवाकर वाघे व जिल्हा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कलविले आहे