अप्रतिम व्यक्तिचित्रे: मार्क्विस दी लाफायेत! [मॉर्स सॅम्युअल जयंती सप्ताह विशेष.]

45

 

_अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर तारायंत्र संदेशवहन जसजसे वाढत गेले, तसतशी मॉर्स यांची कीर्ती व संपत्तीही वाढत गेली. वृद्धापकाळात त्यांनी परोपकाराच्या उदात्त हेतूने ते स्वतः संस्थापक व विश्वस्त असलेल्या व्हॅसर कॉलेजला, त्यांच्या येल कॉलेज या मातृसंस्थेला, धार्मिक संस्थांना व संघटनांना तसेच गरीब कलाकारांना सढळपणे आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना अनेक बहुमान मिळाले. मॉर्स यांच्या स्वतःच्या आयुष्यातच तारायंत्रामुळे जगाचे स्वरूप कितीतरी बदलले. अशी ही ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार- यांच्या या लेखात जरूर वाचा… संपादक._

अमेरिकेच्या सरकारने या शोधाचे हक्क विकत घेण्यास नकार दिल्यावर मॉर्स यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. तारायंत्राचा प्रसार लवकरच झपाट्याने वाढला व बहुतेक देशांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. तथापि लगेचच मॉर्स यांच्यावर त्यांचे भागीदार व प्रतिस्पर्धी संशोधक यांनी शोधाच्या अधिकाराबाबत दावे लावले. अतिशय खर्चिक न्यायालयीन खटल्यांचा दीर्घ मालिकेनंतर इ.स.१८५४ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मॉर्स यांचा एकस्व अधिकार मान्य केला. अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर तारायंत्र संदेशवहन जसजसे वाढत गेले, तसतशी मॉर्स यांची कीर्ती व संपत्तीही वाढत गेली. वृद्धापकाळात त्यांनी परोपकाराच्या उदात्त हेतूने ते स्वतः संस्थापक व विश्वस्त असलेल्या व्हॅसर कॉलेजला, त्यांच्या येल कॉलेज या मातृसंस्थेला, धार्मिक संस्थांना व संघटनांना तसेच गरीब कलाकारांना सढळपणे आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना अनेक बहुमान मिळाले. मॉर्स यांच्या स्वतःच्या आयुष्यातच तारायंत्रामुळे जगाचे स्वरूप कितीतरी बदलले.
मॉर्स- मोर्स सॅम्युअल फिन्ली ब्रीझ हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक होत. मॉर्स यांचा जन्म दि.२७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्‌सटाऊन- मॅसॅचूसेट्स येथे झाला. त्यांचे शिक्षण अँडोव्हर येथील फिलिप्स ॲकॅडमीत व पुढे येल कॉलेज येथे झाले. विद्यार्थी दशेतच त्याकाळी फारसे आकलन न झालेल्या विद्युत या विषयावरील व्याख्यानामुळे त्यांना गोडी निर्माण झाली. त्याच वेळी त्यांना लघू व्यक्तिचित्रे काढण्याचा छंद जडला. तथापि त्यांच्या वडिलांना त्यांचा हा छंद पसंत नव्हता. सन १८१०मध्ये पदवी संपादन केल्यावर त्यांनी बॉस्टन येथील एका ग्रंथ प्रकाशकाकडे कारकुनाची नोकरी पत्करली. त्या काळचे प्रख्यात अमेरिकन चित्रकार वॉशिंग्टन ऑल्स्टन व गिल्बर्ट स्टूअर्ट यांनी मॉर्स यांच्या चित्रकलेच्या व्यासंगाला प्रोत्साहन दिले. सन १८११ साली ऑल्स्टन यांचे विद्यार्थी म्हणून ते इंग्लंडला चित्रकलेच्या अभ्यासासाठी गेले. तेथील त्या कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक शैलीचा- दंतकथा व ऐतिहासिक घटना यांच्या अद्‌भूत चित्रणाचा त्यांनी स्वीकार केला. तथापि १८१५ मध्ये ते अमेरिकेला परतले तेव्हा अमेरिकन लोकांना त्यांच्या ऐतिहासिक चित्रांत रस नाही, असे त्यांना दिसून आले. त्यामुळे नाइलाजाने त्यांना अर्थार्जनासाठी व्यक्तिचित्रे रंगविण्याचा व्यवसाय पुन्हा पत्करावा लागला. त्यांनी न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क व द.कॅरोलायना या राज्यांत ‘फिरते चित्रकार’ म्हणून सुरुवात केली. इ.स. १८२५नंतर न्यूयॉर्क शहरात स्थायिक झाल्यावर त्यांनी काही अप्रतिम व्यक्तिचित्रे रंगवली. त्यांतील मार्क्विस दी लाफायेत यांची दोन व्यक्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
इ.स.१८१७मध्ये त्यांनी आपले धाकटे बंधू सिडनी एडवर्ड्‌स मॉर्स यांच्या समवेत पंपासंबंधीची तीन एकस्वे- पेटंटे मिळविली होती. संगमरवरावर कोरीव काम करण्याचे एक यंत्र त्यांनी सन १८२३मध्ये विकसित केले. त्यानंतर विद्युत विषयक प्रयोगांत त्यांनी सातत्याने विशेष रस घेतला. सन १८३२मध्ये फ्रान्सहून जहाजातून परत येतानाच्या प्रवासात चार्लस टी.जॅक्सन यांनी मॉर्स यांना लांब अंतरावर विद्युत प्रेषण करणारे व फ्रान्समध्ये मिळवलेले एक उपकरण दाखविले. यामुळे मॉर्स यांना विद्युत व तारायंत्र या विषयांत अधिक स्वारस्य निर्माण झाले. पुढील तीन वर्षे त्यांनी अनेक प्रयोग करून सन १८३५मध्ये पहिले विद्युत चुंबकीय तारायंत्र उपकरण केले. यात एक विद्युत मंडल चालू व बंद करून संकेत प्रेषण करणारा प्रेषक, संकेतांची नोंद करणारा विद्युत चुंबकीय ग्राही आणि संकेतांचे अक्षरे व संख्या यात रूपांतर करणारी सांकेतिक लिपी यांचा समावेश होता. त्यांनी योजलेली ठिपके- डॉट्स व प्रास- डॅशेस यांवर आधारलेली सांकेतिक लिपी अद्यापही त्यांच्या नावाने ओळखली जाते. ज्यात कट्ट व कड या दोन ध्वनींच्या साहाय्याने ठिपका व प्रास दर्शविले जातात. पुढे त्यांनी अधिक लांब अंतरावर संदेश पाठविण्यासाठी विद्युत चुंबकीय अभिचलित्रांच्या प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या शोधाच्या विकासात त्यांना एल.डी.गेल व जोझेफ हेन्री यांचे तांत्रिक साहाय्य आणि ॲल्फ्रेड व्हेल यांचे आर्थिक साहाय्य लाभले. मॉर्स यांनी सन १८३७मध्ये आपल्या शोधाच्या एकस्वाकरिता अर्ज केला, परंतु त्यांना आपल्या शोधाला मान्यता मिळवण्यास जवळजवळ सात वर्षे वाट पहावी लागली. शेवटी सन १८४३मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने वॉशिंग्टन ते बाल्टिमोर यांच्या दरम्यान तारयंत्राद्वारे प्रायोगिक संदेशवहन प्रस्थापित करण्यासाठी तीस हजार डॉलरचे अनुदान मंजूर केले. दि.२४ मे १८४४ रोजी या योजनेद्वारे पहिला संदेश प्रेषित करण्यात आला.
मॉर्स यांच्यात नेतृत्वाचेही गुण होते. रंगभूमीवरील स्वैराचार विरुद्ध मोहीम उघडण्याचा एक भाग म्हणून त्यांनी सन १८२७मध्ये न्यूयॉर्क येथे जर्नल ऑफ कॉमर्स हे रंगभूमीसंबंधीच्या जाहिराती स्वीकारण्यास नकार देणारे नियकालिक स्थापन करण्यास मदत केली. चित्रकारांना मदत करण्यासाठी व अमेरिकन जनतेची कलाविषयक अभिरुची उंचावण्यासाठी नॅशनल ॲकॅडेमी ऑफ डिझाइन या सन १८२६मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे ते एक संस्थापक व पहिले अध्यक्षही होते. सन १८३२-३६ या काळात त्यांनी नेटिव्ह अमेरिकन चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. तिच्यातर्फे न्यूयॉर्क शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणूनही ते उभे राहिले होते. परंतु राजकारणातील त्यांचा सहभाग अयशस्वी ठरला. सन १९२२मध्ये ते युरोपला गेले आणि तेथे अभ्यास, प्रवास व चित्ररेखाटन यांत तीन वर्षे त्यांनी खर्च केली. सन १८३२मध्ये अमेरिकेला परतल्यावर न्यूयॉर्क विद्यापीठात चित्रकला व शिल्पकला या विषयांच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. पुढे तेथेच ते संकल्प चित्रकलेच्या वाङ्‌मयाचे प्राध्यापक झाले होते.
मॉर्स यांचे देहावसान वयाच्या ९९व्या वर्षी न्यूयॉर्क येथे दि.२ एप्रिल १८७२ रोजी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तारायंत्राचे जनक ही त्यांची कीर्ती दूरध्वनी, रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या शोधामुळे पुसट होत गेली, तथापि चित्रकार म्हणून त्यांची ख्याती मात्र वाढली आहे. त्यांची व्यक्तिचित्रे जगातील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केली गेलेली आहेत. त्यांचे तारायंत्र उपकरण वॉशिंग्टन येथील नॅशनल म्युझियम ऑफ हिस्टरी अँड टेक्नॉलॉजी या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे.
!! जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या लोकोपयोगी संशोधनास विनम्र अभिवादन !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.