धरणगावात रविवारी खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन; इंदिरा गांधी मैदानात सुवर्ण पदक विजेते व महाराष्ट्र केसरी यांच्यात थरार रंगणार

194

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : खान्देशाची कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या धरणगावात चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त कुस्तीपटूंसाठी खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ एप्रिल, रविवार रोजी सायं.५ वाजता, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात कुस्तीचा थरार रंगणार असून विजयी मल्लांना लाखांवर रोख बक्षिसे दिली जाणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील प्रथम विजेत्याला २ लाख ५१ हजाराचे तर दुसऱ्या खुल्या गटातील विजेत्यास ५१ हजारांचे बक्षीस आहे.
यास्पर्धेत महाराष्ट्रसह भारतातील विविध राज्यातील मल्लांचा मुकाबला होत आहे. खुल्या मैदानी काटा कुस्ती सामन्यात उपमहाराष्ट्र केसरी पुणे किरण भगत व पंजाब केसरी मुकेश कोहली यांच्यात २ लाख ५१ हजाराची जोड होणार आहे, तर दुसरी जोड मुसा पहिलवान राष्ट्रीय विजेता इंदोर व हितेश पाटील महाराष्ट्र चॅम्पियन पुणे, यांच्यात ५१ हजाराची काटा जोड होणार आहे. यांसह समाधान गोरखे महाराष्ट्र पुणे, शानु ठाकुर इंटरनॅशनल दिल्ली, राहीलखान दिल्ली, अजिंक्य माळी पोहरे, कल्पेश पहिलवान पेंडगाव, शादाब पहिलवान भुसावळ, शाकीर पहिलवान कासोदा, महेश पहेलवान धरणगाव, शुभम पहिलवान कासोदा, निलेश पहिलवान धरणगाव, सुमित पहिलवान एरंडोल, मोनीस पहिलवान धरणगाव, गणेश गोहर आकतवाडा, इम्रान शेख जतवाडे, गणेश पहिलवान जिल्हा चॅम्पियन पिंप्री, इरफान शेख जतवाडे, वकार पहिलवान बुरहानपुर, आबा पहिलवान धरणगाव, अजय पहिलवान धरणगाव, दशरथ पहिलवान पाचोरा, जफर पहिलवान रावेर, कृष्णा पहिलवान धरणगाव, समर्थ पहिलवान धरणगाव, ओम पहिलवान कासोदा, असे एकूण ३२ नामवंत पहिलवान लढतीसाठी सज्ज झाले आहेत. खुल्या स्पर्धेसाठी नामवंत मल्लांनी भाग घ्यावा, असे आवाहन चंदन गुरु प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व संचालकांनी केले आहे.